Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

देशाला दिशा देणाऱ्या शिक्षकांच्या व्यथा समजून घ्याव्यात…..!

देशाला दिशा देणाऱ्या शिक्षकांच्या व्यथा समजून घ्याव्यात…..!nnप्राथमिक शिक्षिका सुप्रिया गेनबा आगवणे यांचे मत.nnसातव्या वेतन आयोगामुळे शिक्षक झाले मालामाल! अशा बातम्या देणाऱ्या सर्व न्यूज चॅनेल आणि वृत्तपत्रांना कोरोना काळात मृत्युमुखी पडलेले हेच शिक्षक का नाही दिसले?nnप्रत्येक वेळी देशावर संकट आले कि प्राथमिक शिक्षक उभा राहिला. शिक्षकांच्या परवानगीशिवाय दुष्काळ निधी, पूरग्रस्तांसाठी निधी, कोरोना सहाय्यता निधी पगारा मधून कट करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केले गेले. याच काळात आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये महागाई भत्ता शिक्षकांना दिला गेला नाही.nयाव्यतिरिक्त तालुका ,जिल्हा आणि राज्य स्तरावरील प्राथमिक शिक्षकांच्या अनेक राजकीय संघटनांनी लाखो रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केला.nयाच शिक्षकांनी कोविड सेंटर उभारले. ऑक्सीजन सिलेंडर दान केले. पण सरकार पत्रकार परिषदेत शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणं तर सोडाच पण कोरुना योद्धा म्हणून सर्वे ड्युटी करताना मृत्युमुखी पडलेल्या माझ्या शिक्षक बांधवांच्या कुटुंबीयांना आधार द्यावा, श्रद्धांजली अर्पण करावी हे सुद्धा जमलं नाही.nnआज सद्यपरिस्थितीत पुणे जिल्ह्यात शंभरच्यावर प्राथमिक शिक्षक कोरुना बाधित झाले आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.nयामध्येच काही शिक्षक बांधव डीसीपीएस धारक आहेत.. त्यांना पेन्शन नाही मग त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला आधार कोण देणार?nnइंदापूर तालुक्यात चार शिक्षक कोरोना योद्धा म्हणून काम करत असताना मयत झाले. शासनाने मंजूर केलेल्या 50 लाखाचा विमा मिळवण्यासाठी कुटुंबीय शासन दरबारी फेऱ्या मारत आहेत.nआज वर्ष झाले तरी मात्र शासन विमा अजून कागदावरच आहे.nशासनाच्या व्हाट्सअप वर पाठवलेल्या एका मेसेजवर कोरोना बाधित लोकांच्या प्रत्यक्ष संपर्कात जाऊन काम करणाऱ्या शिक्षकांचे कुटुंबीय आज वाऱ्यावर आहे.nज्या प्राथमिक शिक्षकाने समाजातील प्रत्येक व्यक्तीला शिक्षित केले, वेगवेगळ्या पदावर बसवण्यासाठी लायक बनवले त्याच शिक्षकाची अशी दयनीय अवस्था करणे शासनासाठी लाजिरवाने आहे.nnआज वर्ष झाले ऑनलाइन शिक्षणाबरोबरच कोरूना योद्धा म्हणून शिक्षक बांधव काम करत आहे. कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण नसताना covidसेंटर वर नाईट ड्युटी करत आहे. पण गुरुपौर्णिमा साजरी करणाऱ्या या देशात मात्र याच शिक्षकाच्या वीर मरणानंतर विमा मिळवण्यासाठी पायपीट करावी लागते यासारखं दुसरं दुर्दैव कोणतं?nnहजारो कोटींची संसद बांधणाऱ्या देशात, शेकडो कोटींचे आमदार निवास बांधणाऱ्या या राज्यात शिक्षकाचे मरण इतका स्वस्त आहे का?nअत्यंत हलक्या दर्जाचे सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोज, मास्क देऊन मरणाच्या खाईत ढकलणारे हे शासन आणखी किती शिक्षक बांधवांचे जीव घेणार आहे, किती भगिनी विधवा किती मुले पोरकी होणार आहेत.nसुप्रिया आगवणे ह्या इंदापूर तालुक्यातील रेडणी येथील प्राथमिक शाळेच्या शिक्षिका आहेत.nnदेशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्र शासनाला एका प्राथमिक शिक्षिकेची एकच विनंती…nnदेशावर ज्या ज्या वेळी नैसर्गिक आपत्ती आली त्यावेळी माझा शिक्षक बांधव एका सैनिकाचा सारखा उभा राहिला आहे. याच माझ्या बांधवांना वीर मरण प्राप्त झाल्यानंतर शहीद म्हणून घोषित करा, त्यासाठी कोणत्या मुहूर्ताची वाट पाहू नका. शासकीय इतमामात माझ्या शहीद शिक्षक बांधवाचा अंत्यविधी करा. मानाने आणि सन्मानाने त्यांना घरी जाऊन वीमा रक्कम प्रदान करा.तेव्हाच शिक्षकाने केलेले बलिदान समाजासाठी आदर्श ठरेल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *