अखेर ऑफलाईनची कोंडी फुटली – ॲड. शिवराज कदम-जहागिरदारnn
nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnमहाराष्ट्र राज्यातील धर्मादाय कार्यालयांमध्ये संस्था व ट्रस्ट नोंदणी प्रस्ताव केवळ ऑनलाईन पद्धतीने दाखल करण्याचा शासन निर्णय झाला होता. तथापी धर्मादाय संघटनेचा मुंबई कार्यालयातील सर्वर हा नेहमी बंद पडत असल्याने संस्था नोंदणीची कामे करणाऱ्या वकिलांना खूपच समस्या भेडसावत होत्या. ही कामे बहुतांश उदयोन्मुख वकील करत असल्याने नेहमीच सर्वर बंद राहिल्याने त्यांची चोहोबाजूने आर्थिक व मानसिक कोंडी होत होती.nपुणे धर्मादाय कार्यालयात २००३ पासून वकीली काम करणाऱ्या ॲड. श्रद्धा सुनिल मोरे हिने मुंबई उच्च न्यायालयात ॲड. राहुल कदम यांचे मार्फत या गैरव्यवस्थे विरुद्ध रिट याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये वेबसाइट नेहमीच बंद असल्याने वकील आणि पक्षकारांचे कसे नुकसान होत आहे हे अनेक प्रसंगांमधून दाखवून दिले. न्या. जी एस कुलकर्णी व न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने धर्मादाय आयुक्तांचा याबाबतीत अहवाल मागविला असताना या अहवालामध्ये वेबसाइट मधील त्रुटी आणि सर्वर हा खूप जुना असल्याचे नमूद केले होते. सरकारी वकिलांनी सुद्धा वेबसाइट बंद पडत असल्याबाबत दुजोरा दिला. तसेच ही वेबसाईट तयार करणाऱ्या खासगी कंपनीच्या तंत्रज्ञांना खंडपीठा समोर हजर राहून त्यांची बाजू मांडायचे निर्देश दिले आहेत.nवेबसाईट बंदच असल्याने ऑफलाईन नोंदणी प्रस्ताव दाखल करायला परवानगी देताना राज्यातील सर्व धर्मादाय कार्यालयांमध्ये हे प्रस्ताव स्वीकारावेत असे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच धर्मादाय आयुक्तांनी ऑफलाईन प्रस्ताव स्वीकरून योग्य कार्यवाही करण्याचे आदेश त्यांचे अधिनस्त सर्व कार्यालयांना द्यावेत असेही स्वतंत्रपणे नमूद केले आहे. हा आदेश येताच पुणे कार्यालयातील वकील एड. अश्विनी नलावडे यांनी त्यांचा एक संस्था नोंदणी प्रस्ताव लागलीच दाखल केला. गेली तीस वर्ष पुणे धर्मादाय कार्यालयात श्रद्धाचे वडील सुनिल मोरे हे वकिली करतात. मुलीचे हे वकिलांच्या हिताचे राज्यव्यापी परिणाम करणारे यश मिळाल्याची बातमी समजल्यावर ते अतिशय सद्गदीत झाले. याचिकाकर्त्यांच्या वतीने एड. राहुल कदम यांनी काम पाहिले.n————————————-nयापूर्वीही अशाच प्रकारे ऑफलाईन प्रस्ताव स्वीकारण्याचे मुंबई उच्च न्यायालया २०१८ साली आदेश दिले होते. मात्र सक्षम वेबसाईट नसताना वकिलांनी ऑनलाईन प्रस्ताव दाखल करायला शासनाने सक्ती केली होती. वेबसाईट वारंवार बंद पडत असल्याने एड. श्रद्धा मोरे हिने अन्यायाविरुद्ध सनदशीर मार्गाने दाद मागितली हे स्तुत्य आहे.nॲड. शिवराज कदम जहागिरदारnमाजी अध्यक्ष, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशन, पुणे