माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले भरणे कुटुंबियांचे सांत्वन
nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnदि.२ : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व कुटुंबीयांचे भरणेवाडी येथे जाऊन सांत्वन केले. दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्री गिरीजाबाई विठोबा भरणे यांचे वृध्दापकाळाने शुक्रवारी निधन झाले.nnभरणे कुटुंबावर कोसळलेल्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी हर्षवर्धन पाटील व निरा-भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी गिरीजाबाई भरणे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.