Uncategorized

इंदापूरात एका म्यानात दोन -तीन तलवारी राहणार का ?

nnइंदापूरात एका म्यानात दोन -तीन तलवारी राहणार का ?nn nnसचिन तरंगे ( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnरेडणी, दि.23 : पवार विरोध हा इंदापूर तालुक्यातील भाजपच्या राजकीय नेत्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू. आता तोच नसेल तर त्यांचे राजकारण काय राहील ?nnराज्यात राष्ट्रवादी ने भाजप सोबत संसार थाटल्यापासून इंदापूरातील भाजप कार्यकर्ते अस्वस्थ असतील.एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेतील नेत्यांचीही अनेक ठिकाणी पंचाईत झाली आहेच.nnराज्यात राष्ट्रवादी ने भाजप बरोबर संसार थाटला पण खालच्या स्थरापर्यंत कार्यक्रत्यांची मने काही जुळलेली दिसत नाहीत.nnराज्यात राष्ट्रवादी चे दबावाचे राजकारण भाजप आणि शिंदे सेनेलाही अस्वस्थ करत राहील.nnnnराष्ट्रवादी ची पक्ष चालविण्याची पद्धत वेगळी आहे. आमदाराने पक्षासाठी काय केले आणि पक्षाने आमदारासाठी काय केले, किती दिले? (योगदान ) याचा हिशोब घेण्याची पद्धत, रीत त्या पक्षात आहे.मात्र ही पद्धत इंदापूरात शिवसेना आणि भाजप मध्ये ‘अस्वस्थ करणारी आहे कारण त्यांच्याकडे त्यांच्या पक्षाचा आमदार नाही.मात्र त्यांच्याकडे ‘गर्दी ‘दिसत आहे.ती मतांमध्ये बदलावी यासाठी आक्रमक काम करणारे नेटवर्क ‘चार्जिंग ‘पाहिजे.nnइंदापूरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व दत्तात्रय भरणे करीत आहेत, आणि भाजप चे नेतृत्व हर्षवर्धन पाटील करीत आहेत, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेतृत्व महारुद्र पाटील करतायेत,असे मागील तीन महिन्यातील राजकीय चित्र दिसून येतय. मात्र या महिन्यात भांडगाव येथे झालेल्या कार्यक्रमात महारुद्र पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची कन्या बारामती च्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या सोबत दिसल्याने नेमकी राजकीय भूमिका स्पष्ट नाही.nnnnइंदापूरात तिन्ही पक्ष एककटे मोठे व्हायला धडपडत आहेत. पण प्रत्यक्षात आपण तिघे मिळून आपण मोठे होऊ असा विचार होताना दिसत नाही.nnराज्यात अजित पावरांची राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदेची शिवसेना, आणि भाजप या तिघांमध्ये पक्ष संघटनेच्या पातळीवर चिंता आहे. त्यात इंदापूरात चिंता ही एकनाथ शिंदे च्या शिवसेने बाबत अधिक दिसते आहे. इंदापूरात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कडे तोडीचे नेते आहेत.राष्ट्रवादी कडे माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि भाजपकडे माजी कॅबिनेट मंत्री हर्षवर्धन पाटील आहेत.nnभरणे आणि पाटील दोघांवर पक्ष वाढीची जवाबदारी आहे. पण यांची स्वतः च्या परीघापलीकडे योगदान देण्याची इच्छा दिसत नाही,nnभरणे आणि पाटील यांच्या कडे त्यांच्याविषयीचे “गुडविल “तयार करणारी यंत्रणा ते दोघे ‘मंत्री ‘असताना होती, पण आता नाही.nnइंदापूरात पाटील आणि भरणे यांच्या सोबत तेच ते वेगवेगळे इंटरेस्ट घेऊन काम करणारे लोक सोबत असतील तर नेत्याला मोठे करण्यावर फोकस राहत नाही. पाटील आणि भरणे यांच्या अवतीभोवती च्या काही लोकांकडे पाहिल्यावर तेच जाणवत राहते. या नेत्यांऐवजी स्वतःला मोठे होण्याची महत्वाकांक्षा सहकार्यामध्ये असेल तर ती नेत्याला अडचणीत आणत असते.nnnnदेशात व राज्यात मोदी -शहाचा राजकीय बोलबाला आहे.राज्यात शिंदे -फडणवीस -पवार अशी राजकीय पॉवर आहे. सत्ता आहे.nnसध्या इंदापूरात देश पातळीवर मोदी- शहा ची प्रशांसा होत आहे, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार प्रशांसा करतायेत. इंदापूरात मात्र चित्र वेगळं आहे.nnइंदापूरात हर्षवर्धन पाटील यांना आमदार आणि मंत्री करण्यात माजी खासदार आणि मंत्री शंकरराव पाटील, माजी आमदार राजेंद्रकुमार घोलप यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि दत्तात्रय भरणे यांना आमदार आणि मंत्री करण्यात खासदार शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचं खूप मोठं योगदान आहे.हे विसरून चालणार नाही,. पण लक्षात कोण घेतो…..!nnपरंतू राज्यात एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार याची सत्ता असल्यामुळे मोदी -शहा -अजितदादा यांचा नावाचा राजकीय जयजयकार राष्ट्रवादी आणि भाजप करीत आहेत.nnमात्र भरणे या नादात शरद पवार आणि सुप्रिया सुळे तर पाटील हे शंकरराव पाटील, राजेंद्रकुमार घोलप,यांना विसरत चालले आहे. हे वेगवेगळ्या मोर्च्यात दिसून आले आहे.त्यांच्या नावाच्या घोषणा कुठेही एकावयास मिळत नाहीत.nnभविष्यात इंदापूरात शिंदे -फडणवीस -पवार यांची युती झाल्यास एका म्यान्यात एकच तलवार ठेवावी लागेल. पण ती शक्यता धुसूर आहे.nnत्यातच लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे इंदापूर दौऱ्यावर येऊन गेल्या. त्याच्या गाडीत जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रविण माने, आणि धनगर आरक्षण कृती समिती चे सदस्य शशिकांत तरंगे होते. त्यांच्या भांडगावं ते पंढरपूर हा पालखी मार्गांवरील एकत्र प्रवास इंदापूरातील विधानसभेच्या राजकारणाला “राजकीय वळण” कि ”धक्का तंत्र” देणार ‘….. हे पाहावे लागेल.nnलोकसभेनंतर इंदापूर विधानसभेचा ”राजकीय स्फ़ोट ”अटळ आहे. हे मात्र नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *