Uncategorized

मला सत्तेशी काही देणं-घेणं नाही. मी लहानपणापासून सत्ता पाहिलीय.!आ.प्रणिती शिंदे

मला सत्तेशी काही देणं-घेणं नाही. मी लहानपणापासून सत्ता पाहिलीय.!आ.प्रणिती शिंदेnnउजनीच्या पाण्यावरून संघर्षnnसचिन तरंगे ( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnसोलापूर च्या काॅंग्रेस आमदार प्राणिती शिंदे यांनी उजनीच्या पाणी प्रश्नावरून सरकारला व पालकमंत्र्यांना घरचा आहेर दिलाय.nnसोलापूरचं पाणी पळविण्याचा प्रयत्न केला, तर रान पेटवू असा इशारा काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी आघाडी सरकारला दिलाय.nnमला सत्तेशी काही देणं-घेणं नाही. मी लहानपणापासून सत्ता पाहिलीय, असंही आमदार शिंदेंनी स्पष्ट केलंय.nnउजनी धरणाचे पाणी इंदापूर आणि बारामतीला देण्याच्या प्रश्नावर आमदार शिंदेंनी माध्यमांपुढं आपली भूमिका स्पष्ट केलीय.nnत्यांच्या या भूमिकेमूळे आमदार प्रणिती शिंदे व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यात संघर्ष तीव्र होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.nnप्रणिती शिंदे म्हणाल्या, ‘उजनीचे पाणी 20 वर्षांपूर्वी सुशीलकुमार शिंदे यांनी पाईपलाइनद्वारे सोलापूरला आणलं. आता उजनी प्लस असूनही महापालिकेतून याचं नियोजन होत नाहीय. कॉंग्रेस सत्तेत असताना दुष्काळातसुध्दा दोन दिवसाआड सोलापूरला पाणी मिळत होतं. तेव्हा उजनी मायनसमध्ये होतं, तरीही पाणीपुरवठा सुरळीत ठेवलाnnपृथ्वीराज चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री असताना एका रात्रीत दोन कोटी रुपये खर्च करुन सक्शन पंप लावून रात्रीत पाणी आणलं.’nnआम्ही सोलापूर हद्दवाढ भागातही दोन दिवसाआड पाणी देण्याचा प्रयत्न केला.nnआता उजनी प्लसमध्ये असतानासुद्धा पाणी दुसरीकडं वळवण्याचा प्रयत्न होत असेल, तर आम्ही काय मेलो का? मला सत्तेशी काही देणं-घेणं नाही. मी लहानपणापासून सत्ता पाहिलीय.nnसोलापूरकरांचं पाणी वळवत असाल तर खबरदार आम्ही रान पेटवल्याशिवाय राहणार नाही, असा स्पष्ट इशारा आमदार शिंदेंनी सरकारला दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *