Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

मंदिरांमध्ये फक्त देवच व्ही आय पी

मंदिरांमध्ये फक्त देवच व्ही आय पीnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnअतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सोबत किंवा त्यांच्या शिफारसीने प्रख्यात व दर्शनेच्छु भाविकांची गर्दी असलेल्या मंदिरामध्ये ‘व्ही आय पी दर्शन’ पद्धतीवर न्यायालयाने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. मंदीरामध्ये दर्शनाला आलेला सामान्य भाविक व विशेष दर्शन सुविधा घेणाऱ्यांमुळे देवासमोरच भेदभाव होत असून अशा प्रकारांना आळा घातला पाहिजे. तसेच शिफारशींद्वारे अशा पद्धतीने फुकट विशेष दर्शन सुविधांचाही अतिरेक होत असल्याने हे प्रकार रोखण्यास सक्त नियमावली केली पाहिजे असे मत न्यायालयाने नोंदविले आहे.nतिरूचेंदूर येथील सुब्रमणियम स्वामी मंदीरातील दर्शन व्यवस्थेतील अनागोंदीबाबत एका याचिकेवर निकाल देताना मद्रास उच्च न्यायालयाने मंदिर प्रशासनावर कडक ताशेरे ओढले आहेत.nnसामान्य भाविक तासंतास दर्शनरांगेत उभा असतो परंतु आयत्यावेळी येणाऱ्या उच्चपदस्थ सरकारी अधिकारी, राजकारणी व व्ही आय पीं मुळे दर्शनरांग खंडित झाल्याने त्याच्या त्रासात भरलपडते. व्ही आय पी कल्चरच्या अतिरेकाने लोक त्रस्त झाले आहेत. देवाच्या दारात हा भेदभाव होत असल्याने प्रसंगी त्रस्त भाविकांचा तळतळाट प्रशासनाला लागत असेल असे निकाल पत्रात निरिक्षण केले आहे. त्यामुळे शिफारसींवरून फुकट व विशेष दर्शनपद्धत बंद करावी असे निर्देश देण्यात आले आहेत. अशा अनावश्यक व समानतेच्या तत्वांचा भंग करणाऱ्या परंपरांवर निधी खर्च करण्याऐवजी देवस्थानच्या निधीतून सामान्य भाविकांना अधिक सुखसोई पुरवाव्यात असे या निकालपत्रात म्हटले आहे.nnत्याच प्रमाणे मंदिराशी निगडीत घटक किंवा अर्चकांकडून भाविकांचे आर्थिक शोषण व फसवणूक होत असेल तर विश्वस्तांनी त्यांचेवर थेट कारवाई करावी असेही या निकालपत्रात नमूद केले आहे.n——————————nराज्यघटनेने ज्या घटनात्मक व्यक्तींना राष्ट्रीय बहुमान व सुरक्षेच्या कारणास्तव अतिमहत्वाचा दर्जा दिला आहे अशा व्यक्ती सोडून इतरांना या निर्णयामुळे विशेष दर्शनावर निर्बंध येतील. दर्शनबारीतील सामान्य भाविकांना दिलासा देणारा हा निर्णय आहे.n*ॲड. शिवराज प्र. कदम जहागिरदार*nअध्यक्ष, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *