Uncategorized

श्री छत्रपती राजे माजी सैनिक संघाकडून प्रजासत्ताक दिन साजरा 

श्री छत्रपती राजे माजी सैनिक संघाकडून प्रजासत्ताक दिन साजराnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnवालचंदनगर ( ता.इंदापूर ) येथील श्री छत्रपती राजे माजी सैनिक संघाच्या वतीने 73 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी रतीलाल चौधर, राष्ट्रपती पदक, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, वालचंदनगर पोलीस स्टेशन यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले.nnतसेच Hon Capt शिव कुमार पाल, वालचंदनगर इंडस्ट्रीज, सेक्युरीटी ऑफिसर व कळंब येथील विश्वासराव रणशिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अंकुशराव आहेर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .nnकार्यक्रम श्री छत्रपती राजे माजी सैनिक संघाचे अध्यक्ष पंढरीनाथ बोंद्रे, उपाध्यक्ष ज्ञानदेव निंबाळकर व सर्व सदस्य यांनी पार पाडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र चव्हाण यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *