Uncategorized

वालचंदनगर येथे महिलांचे आमरण उपोषण

वालचंदनगर येथे महिलांचे आमरण उपोषणnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnवालचंदनगर ( ता.इंदापूर ) येथील भारत गॅसच्या चकोर एंटरप्रायजेस एजन्सी समोर श्रीमती नीता राजेश ठोंबरे, हसीना रफीक मणेरी, संगीता धनंजय खेडकर या महिला सोमवार, दि. 24/1/2022 पासून विविध मागण्या संदर्भात उपोषणास बसलेल्या आहेत.nnया महिलांनी आपले लेखी निवेदनात कै.राजेश ठोंबरे, रफीक मणेरी, धनंजय खेडकर यांचा चकोर भारत गॅस एजन्सीकडून तीन वर्षाचा पगार, ग्रॅजुटी, फंड, बोनस दिला नसल्याचे नमुद करून न्याय देण्याचे आवाहन केले आहे. या आमरण उपोषणास गोरख खंडागळे, मनोहर घोडके, लता उबाळे यांनी पाठिंबा दिला आहे .nnप्रशासन, पोलीस यंत्रणा व गॅस एजन्सीकडून संबंधित महिलांना कशाप्रकारे न्याय मिळेल हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *