Uncategorized

फडतरे नाॅलेज सिटीत आय टी आय चा माजी विद्यार्थी मेळावा संप्पन्न

फडतरे नाॅलेज सिटीत आय टी आय चा माजी विद्यार्थी मेळावा संप्पन्नnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnकळंब ता.इंदापूर येथे फडतरे नाॅलेज सिटीत आय टी आयचा आज शनिवार, दि. 1/1/2022 रोजी नवीन वर्षाचे औचित्त साधून माजी विद्यार्थी मेळावा संप्पन्न झाला. झालेल्या माजी विद्यार्थी मेळाव्यात आय टी आय कळंब चे 545 विद्यार्थी उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव नवीन मुलांना सांगितले , माजी विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला.nnया कार्यक्रमासाठी राज्याचे राज्यमंत्री मा. ना दत्तात्रय मामा भरणे, वालचंद इंडस्ट्रिज लिमिटेड चे गेंगजे साहेब, पियाजिओ चे भोसले साहेब, इंदापूर तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष कोकाटे साहेब, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ साहेब, संस्थेचे सचिव तथा इंदापूर मार्केट कमिटीचे विद्यमान सभापती दत्तात्रय आबा फडतरे, संस्थेचे उपाध्यक्ष बाहुबलीशेठ गांधी, मधुकर बापू डोंबाळे-पाटील, इंग्लिश मिडियमचे प्राचार्य रॉबर्ट सर आय टी आयचे प्राचार्य गणेश चव्हाण सर व स्टाफ व आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरित्या पार करणेकरिता आय टी आय स्टाफचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *