Uncategorized

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या ( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्याnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnपुण्यातील पोलिस विभागातील मोटर परिवहन विभागात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.nया घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. राजेश दगडू महाजनn(वय ५०, रा. हरपळे वस्ती, हडपसर)nअसे आत्महत्या केलेल्या सहाय्यक उपनिरीक्षकाचे नाव आहे.nहडपसर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार,nराजेश महाजन हे पुणे शहर पोलीस दलातील मोटर परिवहन विभागात कार्यरत होते.nपोलीस विभागात रूजू होण्यापूर्वी महाजन हे लष्करात होते.nत्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर ते पोलीस दलामध्ये रूजू झाले होते.nराजेश महाजन यांनी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.nराजेश यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली सुसाईड नोट सापडली असून त्या आधारे तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *