निर्बंधांचे उल्लंघन करून धुमधडाक्यात लग्न करणे संबंधितांना पडले चांगलेच महागात
श्रीकृष्ण सातव ( फलटण तालुका प्रतिनिधी )
सातारा जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या नि र्बंधांचे उल्लंघन करून धुमधडाक्यात लग्न करणे संबंधितांना चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणी बरड येथील मातोश्री मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापकाला पन्नास हजार रुपयाचा दंड करण्यात आला असून दंड वसूल करण्यात आला आहे.
बरड पोलीस ठाणे आणि बरड ग्रामपंचायत यांच्याकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे. शुक्रवार दि. 4 जून रोजी फलटण तालुक्यातील फलटण पंढरपूर रोड वरील बरड गावच्या हद्दीतील मातोश्री मंगल कार्यालयात लग्न सुरू असताना प्रशासनाच्या वतीने त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. वर पक्ष बरड येथील असून वधूपक्ष निरवांगी ता. इंदापूर जिल्हा पुणे येथील आहे.
