इंदापूर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राजकुमार थोरात व उपाध्यक्षपदी शहाजीराजे भोसले…
इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
मुंबई मराठी पत्रकार परिषदेच्या पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न इंदापूर तालुका पत्रकार संघाची द्वैवार्षिक निवडणूक 1 सप्टेंबर 2024 रोजी भरणेवाडी ग्राम सचिवालयात सकाळी 11ते दु. 12 यावेळेत बिनविरोध पार पडली. या निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी एम.जी.शेलार ( दौंड ) व सह.निवडणूक निर्णय अधिकारी रवी पाटील ( शिरूर ) यांनी काम पाहिले.
इंदापुर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी नव-निर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व कार्यकारिणी सदस्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
नव निर्वाचित कार्यकारिणी –
राजकुमार थोरात – अध्यक्ष
शहाजीराजे भोसले – उपाध्यक्ष
शत्रुघ्न ओमासे – उपाध्यक्ष
गजानन टिंगरे – उपाध्यक्ष
तात्यासाहेब घाटे – सचिव
प्रदिप तरंगे – सहसचिव
हरिदास वाघमोडे – खजिनदार
महेश गडदे – सह.खजिनदार
धनंजय थोरात – संघटक
बाळासाहेब धवडे – संघटक
संभाजी रणवरे – सह.संघटक
संतोष भरणे – समन्वयक
डॉ. विकास शहा – सल्लागार
मान्यवरांचे व पत्रकारांचे आभार जिल्हा कार्यकारिणी सदस्य सतिश सांगळे यांनी मानले.
