Fri. Apr 17th, 2026

अजित पवारांना जिल्ह्यात रोखण्यासाठी शरद पवार “हर्षवर्धन पाटलांच्या” संपर्कात !

Spread the love

अजित पवारांना जिल्ह्यात रोखण्यासाठी शरद पवार “हर्षवर्धन पाटलांच्या” संपर्कात !

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

राज्यात विधानसभेचे वातावरण तापायला लागले आहे, महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा राजकीय संघर्ष पाहवयास मिळणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही आमदारांना घेऊन बारामती चे आमदार अजित पवार यांनी महायुती ला राजकीय पाठिंबा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकार मध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत सत्तेत सामील झाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना धक्का देत पक्ष आणि चिन्ह वर दावा करित ‘पक्षातील राजकीय अस्तित्व ‘संपविण्याचा ‘राजकीय डाव ‘अजित पवार यांनी टाकला. आणि शरद पवार यांना अडचणी त आणण्याचा जोरदार प्रयत्न अजित पवार यांनी केला.

पुणे जिल्ह्यातील बहुतांश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार हे अजित पवार यांच्या सोबत गेले. यातील बहुतांश आमदार शरद पवार यांच्या मुळे निवडून आलेत. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्व आमदार शरद पवार यांच्या शेवट च्या प्रचार सभेमुळे च निवडून आलेत, हा राजकीय इतिहास आहे. हे विसरून चालणार नाही , यातील इंदापूर चे आमदार दत्तात्रय भरणे केवळ शरद पवार यांच्याच शेवटच्या प्रचार सभेमुळे निवडून आले आहेत, हे राजकीय विश्लेषक सांगत आहे.

महायुतीने शरद पवार यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘बारामती मतदार ‘संघातच रोखण्यासाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली, परंतू शरद पवार यांनी निवडणूक आचारसंहिता लागताच या मतदार संघात सुप्रिया सुळेच्या बाजूने वातावरण तयार करत ‘विजयाची तुतारी ‘फुंकली.

आज अजित पवार सत्तेत आहेत. त्यांच्याकडे अर्थ व नियोजन खाते आहे. त्यातच ते पुण्याचे पालकमंत्री आहेत.
जिल्ह्यातील सर्व सत्तास्थाने अजित पवारांकडे आहेत.पुणे आणि पिंपरी चिंचवड तसेच ग्रामीण विधानसभा मतदार संघावर अजित पवार स्वतः चे राजकीय वर्चस्व ठेवण्यास सर्व ताकत वापरत आहेत.

काही दिवसापूर्वी पुण्यात जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, शिरूर चे खासदार अमोल कोल्हे, शिरूर चे आमदार अशोक पवार हे च उपस्थित होते. तर महायुतीचे अनेक आमदार व खासदार उपस्थित होते. पुण्याच्या जिल्हा नियोजन समितीवर अजित पवारांचे वर्चस्व आहे.
आणि याच बैठकीत अजित पवारांनी शरद पवार यांना बोलण्यापासून रोखले होते, आणि हीच बाब मीडियाने लावून धरली होती.स्वतः शरद पवार आणि त्यांच्या पक्षाचे जिल्हा नियोजन समितीतील सदस्यांना खटकली.

शरद पवार यांच्या राजकीय दृष्टीने इंदापूर, बारामती, दौंड हे विधानसभा मतदार संघ अत्यंत महत्वाचे आणि राजकीय प्रतिष्ठिचे आहेत. या मतदार संघात काहीही करून या मतदार संघातील आमदार “तुतारी “या चिन्हावर निवडून आणायचे आहेत.

अजित पवारांना पुणे जिल्ह्यात च अडकून ठेवण्यासाठी आणि त्यांना तगडी टक्कर देणारा आक्रमक आणि अभ्यासू उमेदवाराची आवश्यकता आहे, त्यासाठी शरद पवार बारामती, इंदापूर आणि दौंड या मतदार संघावर लक्ष ठेवून आहेत.

लोकसभा निकाला नंतर राजकीय वातावरण खूपच बदललं आहे.राज्यात लोकसभेच्या एकूण जागेत महायुतीला रोखण्यात महाविकास आघाडीला खूप महत्वाचं यश मिळालं आहे.

उद्धव ठाकरे, शरद पवार यांचा पक्ष भाजप ने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या ताब्यात ‘सत्तेचा वापर ‘करून दिला, असा सर्वसामान्य जनतेचा आणि उद्धव ठाकरे व शरद पवार यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनाचा आरोप आहे.

जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट असा सामना अनेक मतदार संघात पहावयास मिळणार आहे. नेमक या उलट परिस्थिती भाजप ची जिल्ह्यात असणार आहे.अनेक विधानसभा मतदार संघात भाजप विरुद्ध अजित पवार गट असा राजकीय संघर्ष उमेदवारी वरून दिसणार आहे.

शरद पवार यांच्या पक्षात नेते आहेत, परंतू पुण्यात आक्रमक व अभ्यासू आणि विधानसभा सभेतील सभागृह चालविणारा नेत्यांची कमतरता आहे. याहून महत्वाचे म्हणजे शरद पवार यांना अजित पवार यांना राजकीय दृष्ट्या टार्गेट करणारा, जिल्ह्यातील प्रशासनावर वचक असणारा आणि अभ्यासू नेत्यांची आवश्यकता आहे. तसेच जिल्ह्यातील प्रशासकीय, विधानसभेतील अनुभवी नेत्यांची गरज आहे. राज्यातील विविध विषयावर अभ्यास आणि राजकीय दरारा असणारा नेत्यांची आवश्यकता आहे. असा राजकीय नेताच अजित पवारांना रोखू शकतो.

पुणे जिल्ह्यात इंदापूर चे माजी आमदार आणि माजी कॅबिनेट मंत्री हर्षवर्धन पाटील यांना राज्यातील विविध विषयाचा, प्रशासन चालविण्याचा, आणि विधासभेतील कामाचा दांडगा अभ्यास आहे. पुण्यातील प्रशासनाचा आणि प्रशासकीय कामाचा अनुभव पाटील यांच्याकडे आहे.
हर्षवर्धन पाटील यांची अभ्यासू आणि आक्रमक अशी ओळख राज्यात आहे. राज्यात त्यांचा एक चाहता वर्ग आहे.

राज्यात त्यांनी यापूर्वी कृषि व जल संधारण राज्यमंत्री, पणन व रोजगार हमी, सहकार व संसदीय कार्यमंत्री, यासारखी कॅबिनेट मंत्री म्हणून तर सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री या पदावर काम केले आहे.

महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, नारायण राणे, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात इंदापूर चे हर्षवर्धन पाटील यांनी काम केले आहे.

इंदापूर चे आमदार असताना मनोहर जोशी, नारायण राणे, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण या सर्व माजी मुख्यमंत्र्यांनी इंदापूर ला विविध विकास कामानिमित्त भेटी दिल्या, तर भारत देशाच्या राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील यांनीही भेटी दिल्या, या सर्वांनी हर्षवर्धन पाटील यांच्या कामांची दखल घेतली होती.

भरणे यांच्या आमदारकीच्या व राज्यमंत्री पदाच्या काळात एकही मुख्यमंत्री आणि अजित पवार वगळता एकही कॅबिनेट दर्जाचा मंत्री तालुक्यात आला नाही.

अजित पवार आक्रमक झाले आहेत, लोकसभेत सुनील तटकरे यांची सीट सोडता सर्व जागेवर त्यांचा पराभव झाला आहे. त्यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे, त्यासाठी राज्यातून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचे त्यांचे टार्गेट आहे, परंतू ह्या सर्व जागा निवडून आणताना अजित पवारांच्या उमेदवारांचा ‘राजकीय सामना ‘शरद पवार यांच्या उमेदवाराशी होणार आहे.

इंदापूर चे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्या हातात “तुतारी”देऊन जिल्ह्यात अजित पवारांना रोखण्याचा राजकीय डाव शरद पवार टाकत आहेत.
शरद पवार यांच्या चक्रव्यूहात अजित पवारांना अडकविण्यासाठी चा प्रयोग यशस्वी होण्यासाठी हर्षवर्धन पाटील च खेळ मांडू शकतात हा विश्वास शरद पवारांना असल्यामुळे पवार हे पाटलांच्या संपर्कात आहेत.

इंदापूर चे हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेत येऊ द्यायचे नाही, ही खेळी अजित पवारांची आहे.

हर्षवर्धन पाटील यांची स्वतः ची एक लाखाहून अधिकची व्होट बँक आहे,या व्होट बँकेचा उपयोग पक्षाला आणि अजित पवारांना रोखण्यासाठी होऊ शकतो, राज्यात हक्काचा आमदार हर्षवर्धन पाटील यांच्या रूपाने मिळू शकतो, आणि हर्षवर्धन पाटील आणि जयंत पाटील यांच्या जोडगोळी मुळे राज्यात पक्षाचा विस्तार आणि राज्यात सत्तेसाठी उपयोग होऊ शकतो, आणि अजित पवारांना जिल्ह्यात च अडकवून ठेवण्यासाठी शरद पवार हे हर्षवर्धन पाटील यांच्या संपर्कात आहेत.

हर्षवर्धन पाटलासारखा ‘राजकीय मोहरा ‘शरद पवारांना मिळाल्यास, राज्याच्या सत्तेच मैदान जिंकल्याशिवाय ‘हर्षवर्धन ‘गप्प बसणार नाहीत.अशी राजकीय गणित अजित पवार आणि दत्तात्रय भरणे यांना ‘राजकीय अडचण ‘ठरू शकते.

Related Post

error: Content is protected !!