Sat. Jun 6th, 2026

केवळ प्रशासकीय कामकाजातील अनियमिततेसाठी लोकशाही पद्धतीने ‘निवडून ‘आलेल्या सरपंच यांना पदावरून दूर करता येणार नाही -मंत्री गिरीश महाजन

Spread the love

केवळ प्रशासकीय कामकाजातील अनियमिततेसाठी लोकशाही पद्धतीने ‘निवडून ‘आलेल्या सरपंच यांना पदावरून दूर करता येणार नाही -मंत्री गिरीश महाजन

रेडा ग्रामपंचायत, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 39(3)बाबत निर्णय

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

मौजे रेडा (ता इंदापूर, जि पुणे ) येथील ग्रामपंचायत च्या सरपंच सौ सुनीता नानासो देवकर यांनी मंत्री, ग्रामविकास महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई यांच्या न्यायालयात क्रमांक व्हीपी एम -2023/प्र. क्र 128/परा -6दाखल केले होते.

अपिलार्थी श्रीमती सुनीता नानासो देवकर, सरपंच ग्रामपंचायत रेडा, ता इंदापूर जि पुणे यांनी पुणे विभागीय आयुक्त पुणे यांचा दिनांक 12.10.2023 चा आदेश रद्द करण्यात यावा, याकरिता ची विनंती मा.मंत्री, ग्रामविकास यांच्या न्यायालयात केली होती.याबाबत 25.10.2023 रोजी अपिलार्थी सरपंच सुनीता नानासो देवकर यांनी अपील दाखल केले होते.

प्रस्तुत प्रकरणात पुणे जिल्हा परिषद पुणे चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिनांक 05.06.2023 रोजी सरपंच सौ सुनीता देवकर यांच्या कार्यकाळातील चौकशी अहवाल चौकशी करून सरपंच, ग्रामसेवक दोषी असल्याचा अहवाल दिला होता.

उपरोक्त विषयाच्या संदर्भात मा. मंत्री (ग्रामविकास )यांच्या न्यायालयामध्ये श्रीमती सौ सुनीता नानासाहेब देवकर, सरपंच ग्रामपंचायत रेडा, ता इंदापूर जि पुणे यांनी दाखल केलेल्या अपील अर्जाच्या च्या अनुषंगाने मा मंत्री (ग्रामविकास )यांनी दिनांक 31.07.2024 त्यांच्या न्यायालयामध्ये व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे रोजी सुनावणी घेण्यात आली.

सदरच्या अपिलार्थी श्रीमती सौ सुनीता नानासो देवकर तर त्यांच्या विरुद्ध प्रतिवादी स्वाती सोमेश्वर देवकर सदस्या,राजश्री मच्छिन्द्र पवार सदस्या,उषा धोंडीराम कांबळे,सदस्या,ज्ञानेश्वर सोपान देवकर, सचिन अंगातरावं देवकर,आत्माराम यशवंत देवकर, मच्छिन्द्र महादेव देवकर,धोंडीराम कांबळे,सोमेश्वर तुकाराम देवकर,तुकाराम सुभाष देवकर, मा विभागीय आयुक्त, पुणे विभाग पुणे, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा परिषद पुणे हे प्रतिवादी होते.

प्रस्तुत प्रकरणात पुणे जिल्हा परिषद पुणे चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिनांक 05.06.2023 रोजी सरपंच सौ सुनीता देवकर यांच्या कार्यकाळातील चौकशी अहवाल चौकशी करून सरपंच, ग्रामसेवक दोषी असल्याचा अहवाल दिला होता.

विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे यांनी दिनांक 12.10.2023 च्या आदेशानव्ये जाब देणार सौ सुनीता नानासो देवकर, सरपंच ग्रामपंचायत रेडा ता इंदापूर जि पुणे यांना सार्वत्रिक निवडणूक 2021 च्या उर्वरित कालावधीसाठी ग्रामपंचायत रेडा ता इंदापूर जि पुणे येथील सरपंच व सदस्य पदावरून काढून टाकण्यात येत आहे,असा निर्णय पारित करण्यात आला होता.

सदर प्रकरणी मा. मंत्री, ग्रामविकास, महाराष्ट्र राज्य, मुबंई यांनी सुनावणी घेऊन प्रस्तुत प्रकरणी विवेचन व निष्कर्ष काढून श्रीमती सुनीता नानासाहेब देवकर, सरपंच, ग्रामपंचायत रेडा, ता इंदापूर जि पुणे यांचेकडून पदाचे विहित कर्तव्य पालनात कसूर निर्विवादपणे झाल्याचे दिसून येत नाही,त्यामुळे विभागीय आयुक्त, पुणे यांनी पारित केलेल्या आदेशात बदल व हस्तक्षेप करण्याची आवश्यकता असून तो रद्द करणे आवश्यक असल्याचा निष्कर्ष मा. मंत्री, ग्रामविकास यांनी काढला.

या सुनावणी मधील विवेचन व निष्कर्ष नुसार अपिलार्थी सुनीता नानासाहेब देवकर, सरपंच, ग्रामपंचायत केवळ प्रशासकी कामकाजातील अनियमिततेसाठी लोकशाही पद्धतीने ‘निवडून ‘आलेल्या सरपंच यांना पदावरून दूर करता येणार नाही -मंत्री गिरीश महाजन यांनी म्हंटले आहे.

या प्रस्तुत प्रकरणी आदेश देत अपिलार्थी सुनीता नानासाहेब देवकर सरपंच ग्रामपंचायत रेडा ता इंदापूर जि पुणे यांचे अपील मान्य करण्यात येत आहे.विभागीय आयुक्त, पुणे विभाग पुणे यांनी प्रस्तुत प्रकरणी दिनांक 12.10.2023 रोजी पारित केलेला आदेश रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय मंत्री ग्रामविकास यांनी दिला आहे.

याबाबत हे आदेश सबधिताना तात्काळ कळविण्यात यावेत असे महाराष्ट्र शासनाचे अव्वर सचिव अरुण.व. शिंदे यांनी दिनांक 12.08.2024 रोजी आदेशीत केले आहे.

Related Post

error: Content is protected !!