पुणे जिल्हा विभागीय क्रीडा स्पर्धांना लवकर प्रारंभ
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे शैक्षणिक वर्ष २०२२ -२३ मधील प्रथम सर्वसाधारण सभा इंदापूर तालुक्यातील कळंब येथील यजमान महाविद्यालय विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात संपन्न झाली. सभेचे उद्घाटन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शारीरिक शिक्षण संचालक डॉ. दीपक माने ,इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव वीरसिंह रणसिंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वस्त कुलदीप हेगडे, विकास रणसिंग, डॉ दत्ता
महादम , प्राचार्य संजय घोडेकर ,डॉ. रमेश गायकवाड, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती अध्यक्ष प्राचार्य डॉ अंकुश आहेर, सचिव डॉ सुहास भैऱट इत्यादी मान्यवर उपस्थित होते.यावेळी इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान चे सचिव विरसिंह रणसिंग यांनी सभेकरिता उपस्थित क्रिडा संचालक दीपक माने व जिल्ह्यातील शारीरिक शिक्षण संचालक यांचे स्वागत केले.रणसिंग महाविद्यालयास यजमानपद मिळाल्याबद्दल प्राचार्य डॉ अंकुश आहेर व शारीरिक शिक्षण संचालक डॉ सुहास भैरट यांचा सन्मान संस्थेच्या वतीने करण्यात आला. क्रिडा संचालक दिपक यांनी नवीन शैक्षणिक धोरणात क्रिडा विभागाला महत्त्व दिले असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व रणसिंग महाविद्यालयाचे जुने ऋणानुबंध असल्याचे सांगितले.
सभेमध्ये अंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेचे वेळापत्रक, चालू वर्षाचे नियमावली बाबत चर्चा करण्यात आली.चालू वर्षाकरिता सहसचिव पदी पदममणी महाविद्यालय पाबळ शारीरिक शिक्षण संचालक तळेकर ,बाबुराव घोलप महाविद्यालय शारीरिक शिक्षण संचालक डॉ विद्या पठारे, अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर शारीरिक शिक्षण संचालक डॉ सुनील पानसरे ,वाघिरे महाविद्यालय सासवड शारीरिक शिक्षण संचालक ऋषिकेश कुंभार यांची निवड करण्यात आली.याप्रसंगी चालू वर्षाच्या शैक्षणिक प्रशस्तीपत्रकाच्या अनावरण तसेच मागील वर्षीच्या विभागीय क्रीडा समितीचा वार्षिक अहवालाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे जिल्ह्यातील ८० महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक सहभागी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रशांत शिंदे ,प्राध्यापक विद्या गुळीक व आभार प्रा. डॉ विजय केसकर यांनी व्यक्त केले.
फोटो ओळ – कळंब येथे क्रिडा विभाग सभेप्रसंगी उपस्थित मान्यवर..
