Thu. Apr 23rd, 2026

सामाजिक कार्याचा वडिलांचा वसा पुढे सुरू ठेवत मुलींनी वडिलांचा वाढदिवसाच्या स्मरणार्थ हरितवारी फाऊंडेशनच्या माध्यमातून वृक्षारोपण करून वाढदिवस केला साजरा

Spread the love

सामाजिक कार्याचा वडिलांचा वसा पुढे सुरू ठेवत मुलींनी वडिलांचा वाढदिवसाच्या स्मरणार्थ हरितवारी फाऊंडेशनच्या माध्यमातून वृक्षारोपण करून वाढदिवस केला साजरा

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

दौंड, दि.7 जुलै : यवत येथील सामाजिक कार्यकर्ते व मुळचे इंदापूर तालुक्यातील कळंबचे प्रकाश भिमराव वरूडकर यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले होते. स्वर्गीय प्रकाश वरूडकर हे हरितवादी फाऊंडेशनचे जेष्ठ सदस्य होते. वृक्षारोपण, रक्तदान शिबिर व कोरोना महामारीत कोविड सेंटर स्वच्छता मोहिम अशा सामाजिक उपक्रमामध्ये प्रकाश वरूडकर यांचा नेहमी मोलाचा वाटा असायचा व याच अनुषंगाने त्यांच्या कार्याचा वसा हाती घेत त्यांच्या दोन्ही मुली शिवव्याख्याती रसिका गणेश सणस ( वरूडकर ) व राष्ट्रीय पै. हर्षदा प्रकाश वरूडकर यांनी आज वडिलांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त भुलेश्वर घाटमाथ्यावर हरितवारी फाऊंडेशनचे सदस्यांसमवेत वृक्षारोपण केले.
यासमयी हरितवारी फाऊंडेशनचे सदस्य मयुर शहा, गणेश दोरगे, ॲड.शुभम मेहेर, पुष्कराज जाधव, अशोक जांबले, सुनिल बोडके, अथर्व अर्जुन, तुषार लाटकर, ओम जांबले आदी उपस्थित होते.

Related Post

error: Content is protected !!