Fri. Apr 24th, 2026

इमारत बांधकामासाठी ग्रामपंचायतीने शासनमान्य ग्रंथालयासाठी कमाल 1 रू.भाडे तत्त्वावर जागा उपलब्ध करून द्यावी – विजयराव कोलते

Spread the love

इमारत बांधकामासाठी ग्रामपंचायतीने शासनमान्य ग्रंथालयासाठी कमाल 1 रू.भाडे तत्त्वावर जागा उपलब्ध करून द्यावी – विजयराव कोलते

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

इंदापूर तालुक्यातील ग्रंथालयाचे अध्यक्ष व ग्रंथपाल यांची सोमवार, दिनांक 20 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 4 वाजता, इंदापूर येथील शासकीय विश्रामगृहात पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे पदाधिकारी यांच्याबरोबर ग्रंथालयांच्या संदर्भात अडचणी, मागणी व तालुका कार्यकारिणी निवड या संदर्भात मिटिंग आयोजित केली होती , यावेळी पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक विजयराव कोलते यांनी इंदापूर तालुक्यातील शासनमान्य ग्रंथालयांचे पदाधिकारी व कर्मचारी यांच्याबरोबर अडचणी,मागणी व कार्यकारिणी निवड या संदर्भात चर्चा केली. यावेळी त्यांनी सांगितले कि , संबंधित गावच्या ग्रामपंचायतींनी शासनमान्य ग्रंथालय इमारत बांधकामासाठी कमाल 1 रू. भाडेतत्त्वावर जागा उपलब्ध करून द्यावी.
यावेळी पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह सोपानराव पवार, माजी.नगराध्यक्ष कृष्णा ताटे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, अंबादास कवळे, दुनाखे सर, संतोष भोसले, विकास गायकवाड, सुरेश देवकर, ज्ञानदेव पोरे, संजय तुपे, अनिल पलंगे, व दंडवते, देशपांडे, कुलकर्णी मॅडम आदी मान्यवर व ग्रंथालयीन पदाधिकारी उपस्थित होते.

Related Post

error: Content is protected !!