गोरगरिबांची व वारकऱ्यांची सेवा हीच परमेश्वराची सेवा – भरत शहा
शहाजीनगर येथील गुरुचरित्र पारायण वारकऱ्यांना मोफत ब्लँकेटचे वाटप
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
झोपडीतील गोरगरिबांची सेवा व गोरगरिबांना केलेली मदत हीच , परमेश्वराची सेवा असते त्यामुळे मानवी जीवनात,अडचणीत सापडलेल्या नागरिकांना मदत केली पाहिजे , असे प्रतिपादन कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन भरत शहा यांनी केले.
इंदापूर तालुक्यातील शहाजीनगर येथील श्री दत्त देवस्थान च्या दत्त जन्मोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या गुरुचरित्र पारायण सोहळ्यातील वारकऱ्यांना दत्त देवस्थान व बालाजी ग्रुप यांच्या वतीने(शनिवार ता.१८) रोजी मोफत ब्लँकेटचे वाटप,तसेच पहाटेची महापूजा महाआरती कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन भरत शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैशाली भरत शहा, युवा उद्योजक अंगद मुकुंद शहा व त्यांच्या पत्नी रुचिरा अंगद शहा,दत्त देवस्थानचे तानाजीराव गायकवाड, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते,सतीश साठे,माऊली सोलंनकर, सोमनाथ मोहिते,सागर शिंदे ह.भ.प तुकाराम महाराज काळकुटे यांच्यासह भक्तगण उपस्थित होते.
पुढे माहिती देताना भरत शहा म्हणाले की, गुरुचरित्र वाचनाची अखंड परंपरा दत्त देवस्थान च्या भक्तगणांनी गेल्या अठरा वर्षांपासून सुरू ठेवलेली आहे. इंदापूर तसेच माळशिरस तालुक्यातील भक्तगणांचे श्रद्धास्थान दत्त देवस्थान असल्यामुळे,ग्रामीण व शहरी भागातील भक्तगणांना दर्शन अन्नदान हरिनाम असा त्रिवेणी संगम या देवस्थानच्या माध्यमातून अनुभवता येत आहे.देवस्थानने सामाजिक जाणिवेतून वारकऱ्यांसाठी कायम मदतीचा हात ठेवला आहे.यामध्ये थंडीच्या हंगामात मोफत ब्लॅंकेट वाटपाचा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी आहे असेही गौरवोद्गार भरत शहा यांनी काढले.
देवस्थानचे प्रमुख तानाजीराव गायकवाड,नीलकंठ मोहिते यांच्या हस्ते उपस्थितांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक ह भ प ईश्वर महाराज यांनी केले तर आभार सोमनाथ मोहिते यांनी मानले.
