Uncategorized

भा.ज.पा.च्या जन आशीर्वाद यात्रेला पोलिसांचा दणका , ३६ गुन्हे दाखल झाले !

भा.ज.पा.च्या जन आशीर्वाद यात्रेला पोलिसांचा दणका , ३६ गुन्हे दाखल झाले !nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnकेंद्र सरकारची कामं जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी भारतीय जनता पार्टीने सुरु केलेल्या जनआशीर्वाद यात्रेला आता पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागत आहे.nआत्तापर्यंत या यात्रेवर ३० हून अधिक गुन्हे मुंबईमध्ये दाखल झाले आहेत.nभा.ज.पा. नेत्यांनी काढलेल्या या यात्रेमध्ये करोना प्रतिबंधाचे नियमही धाब्यावर बसवल्याचं निदर्शनास आलं आहे.nभा.ज.पा.च्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान करोना प्रतिबंधाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल झाल्याचं समोर आलं आहे.n१९ ऑगस्ट रोजी मुंबईच्या विलेपार्ले, खेरवाडी, माहीम, शिवाजी पार्क, दादर, चेंबूर आणि गोवंडी पोलीस स्टेशनमध्ये सात वेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते.nआत्तापर्यंत या यात्रेविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या ३६ वर पोहोचली आहे.nकेंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या यात्रेदरम्यान त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत मोठी गर्दी जमवली.nत्यामुळेही करोना प्रतिबंधाच्या नियमांचं उल्लंघन झालं.nतर केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची जनआशीर्वाद यात्रा विनापरवाना काढण्यात आल्याची बाब समोर आली आहे.nयाप्रकरणी यात्रेचे आयोजन करण्याऱ्या भा.ज.पा.च्या पदाधिकाऱ्यांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.nठाण्यातल्या या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान करोना प्रतिबंधाच्या नियमांचा फज्जा उडाला होता.nतर या यात्रेदरम्यान काही चोरटेही गर्दीत शिरले होते.nत्यांनी काही जणांचे मोबाईल आणि रोकडही चोरी केल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *