Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

भाजप मधील दोन “साइड लाईन”पाटील!

भाजप मधील दोन “साइड लाईन”पाटील!nnसचिन तरंगे ( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnएकेकाळचे कट्टर काँग्रेस नेते पण दोन वर्षांपूर्वी भाजपवासी झालेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. आणि राज्यात चर्चेचा “राजकीय धमाका”झाला. नवी दिल्लीत ही भेट झाली. आणि ही भेट राजकीय व विविध माध्यमानी”राजकीय ब्रेकिंग”न्यूज केली.राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वीच अमित शहा यांची भेट घेतली होती. त्या भेटीची जेवढी चर्चा झाली नाही त्याही पेक्षा अधिक चर्चा या दोन पाटलांच्या भेटीची झाली.nnहर्षवर्धन पाटील व राधाकृष्ण विखे पाटील यांचा काँग्रेसच्या काळात “राजकीय व प्रशासकीय”दबदबा होता, राज्यातील सहकार क्षेत्रातील अभ्यासू नेते ही त्यांची ओळख आहे, या दोघांचा सहकार क्षेत्रातील अभ्यास व अनुभवाचा उपयोग भाजपकडून राज्यात करून घेतला जाईल,अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार आहे.भाजप हा पक्ष संघटनेला अधिक महत्व देतो,अभ्यासू व आक्रमक नेत्यांना भाजपा स्थान दिले जाते.राज्यात काँग्रेस – राष्ट्रवादी चे सरकार होते त्यावेळी हर्षवर्धन पाटील हे राज्याचे सलग ७ वर्षांपेक्षाही अधिक काळ सहकार मंत्री म्हणून मंत्रिमंडळात होते. दोन्ही नेत्यांचा राज्यातील राजकारणावर आणि सहकार क्षेत्रावर खूपच मोठा प्रभाव आहे. विशेष म्हणजे दोघेही राष्ट्रवादीचे कट्टर विरोधक आहेत.nnदेशाच्या राजधानीत या दोन पाटलांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घेतलेल्या भेटीची चर्चा राज्याच्या राजधानीत “ब्रेकिंग न्यूज”होत आहे.nnसध्या राज्यातील बहुतांश भाजप नेते नवी दिल्लीत ये जा करीत आहेत. महाराष्ट्रातून नव्याने केंद्रीय मंत्री झालेल्या मंत्रीमहोदयांची राज्यातील भाजप नेते भेट घेऊन सदिच्छा देत आहेत.या भेटीत राज्यातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा, नियोजन, पक्षासाठीचं येणाऱ्या काळातील प्लॅनिंग वर चर्चा होत आहे.nnदोनच दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी अमित शहा यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर आता हर्षवर्धन पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी अमित शहा यांची भेट घेतलीय.nदेवेंद्र फडणवीस हे विधान सभेतील “विरोधी पक्षनेते”तर पक्ष नेते प्रवीण दरेकर हे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आहेत,यांच्याकडे पदे आहेत,यांची भेट समजून घेता येते परंतु हर्षवर्धन पाटील व राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कडे सद्या कोणतेही पद नाही.मंग यांनी भेट का घेतली असावी?या प्रश्नाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.nnराज्यात तीन पाटील सद्या जोरदार चर्चेत आहेत.चंद्रकांत पाटील,हर्षवर्धन पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील .हे तिघे भाजपचे सक्रिय राज्यस्तरावर काम करणारे नेते आहेत.सद्या यातील एक पाटील राज्यात भारतीय जनता पक्षाचे”प्रदेशाध्यक्ष”आहेत.तर हर्षवर्धन पाटील व राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे “ना पद,ना जवाबदारी”आहे,त्यामुळे या दोन पाटलांचे वर्णन भाजपमधील दोन ‘साईडलाईन पाटील’ असं झालं आहे.nnदोन्ही पाटलांचा भाजप प्रवेश झाला परंतु आता दोन वर्ष उलटून गेली आहेत तरीही भाजपमध्ये त्यांना म्हणावं असं स्थान नाही किंवा त्यांच्या राजकीय कारकीर्दीला शोभेल असं पद नाही.ही राजकीय चर्चा राज्याच्या राजधानीत ब्रेकिंग न्युज म्हणून चर्चेत आहे.nnराधाकृष्ण विखे पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांनी एकाच कारणासाठी “काँग्रेस”सोडलीय. हे कारण आहे… हर्षवर्धन पाटील यांच्या जागेचा वाद तर सुजय विखे यांचं तिकीट. काँग्रेस पक्षातून बाहेर पडताना दोघांचाही राष्ट्रवादीवर रोष होता.nnविशेष म्हणजे अजित पवारांना इंदापूर चा पाटील राजकीय दृष्ट्या नको होता तर शरद पवारांना नगरचा विखे पाटील नको होता.nnभाजपमध्ये प्रवेश करताना पवारांचे राजकीय विरोधक म्हणून मोठ्या सन्मानाने त्यांना प्रवेश दिला गेला. काही राजकीय लाभाची आश्वासने दिली गेली. कारण त्यावेळी राज्यात भाजपची सत्ता येणार, अशी परिस्थिती होती. पण निवडणुकीनंतर राज्यातलं राजकारण बदललं आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं.आणि सर्वच राजकीय गणिते बदलत गेली.nपण आता आजच्या राज्यातील राजकीय परिस्थितीला “दोन्ही अभ्यासू पाटील” भाजपमधून साईडलाईन झालेत. त्यामुळे पक्षप्रवेश करताना त्यांना दिलेल्या आश्वासनाचं काय? असा प्रश्न समोर उभा राहिला आहे. याच विषयांवर अमित शहा यांच्याशी चर्चा झाली असावी, अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.nnवास्तविक पाहता राज्यात दोन्ही नेते मोठे आहेत. आणि त्यांची “राजकीय क्षमता”व”राजकारणाची स्टाईल” वेगळीच आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हे दोन्ही पाटील काँग्रेसमध्ये पहिल्या फळीचे नेते राहिले होते. मंत्रीपदाचा मोठा अनुभव गाठीशी आहे. प्रशासन कसं चालवायचं,आणि पळवायच याची “राजकीय मेख”ह्या दोन्ही पाटलाणा अवगत आहे.हे विरोधकांना व सत्ताधाऱ्यांना चांगलच माहिती आहे.nnराज्याच्या राजकारणात अभ्यासू,अनुभवी,असूनही हे भाजप मधील दोन्हीं पाटील साइड लाईन झालेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *