माजी सैनिक व ज्येष्ठ पत्रकार विलासराव गाढवे यांचे निधनnn
nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnबिजवडी ( ता. इंदापूर ) येथील माजी सैनिक व जेष्ठ पत्रकार विलासराव गणपत गाढवे ( वय ६५ वर्ष ) यांचे दि. २१ नोव्हेंबर रोजी निधन झाले.nnते आप्पा म्हणून सर्वदूर परिचित होते. अत्यंत परखड लेखणी आणि अन्यायाविरुद्ध सडेतोड लिखाण करणारे पत्रकार व सा. लक्ष्मी वैभव चे संपादक म्हणून त्यांना ओळखले जात.nnत्यांच्या मागे पत्नी, तीन मुली, नातवंडेnअसा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.