“भास्कर जाधव, कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही”;nम.न.से.चा इशाराnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnमहापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या चिपळूण शहराचा दौरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली.nयावेळी त्यांनी शहरातील व्यापाऱ्यांना धीर देताना पूरग्रस्तांसाठी नुकसानभरपाईची सर्वकष योजना जाहीर केली जाईल असंही सांगितलं.nमात्र मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यामधील एका घटनेमुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना आणि खास करुन शिवसेनेला चांगलच धारेवर धरलं आहे.nशिवसेनेचे स्थानिक आमदार भास्कर जाधव यांनी एका महिलेला मुख्यमंत्र्यांसमोरच केलेल्या दमदाटीमुळे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने, कोकणी माणूस आगामी निवडणुकीमध्ये भास्कर जाधवांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही,nअसं म्हटलं आहे.nमुख्यमंत्री व्यापाऱ्यांशी चर्चा करीत असतानाच एका महिलेने ओक्साबोक्शी रडत तिची वेदना मांडली.n‘‘पुराचे पाणी माझ्या घराच्या छतापर्यंत पोहोचले.nत्यात सर्वकाही वाहून गेले.nतुम्ही काहीही करा,nपण आम्हाला मदत करा.nमदत केल्याशिवाय जाऊ नका हो’,nअशी विनवणी तिने केली.nमुख्यमंत्र्यांनीही या महिलेपुढे हात जोडत मदतीची ग्वाही दिली.nमात्र यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत असणाऱ्या भास्कर जाधव यांनी या महिलेच्या मुलालाच आईला समजाव असं मुख्यमंत्र्यांसमोरच सांगितलं.nतसेच पुढे जताना त्यांनी या महिलेच्या मुलाला भेट असंही दमदाटी केल्याच्या स्वरात सांगितल्याचं कॅमेरांनी टिपलं.nया संपूर्ण प्रकरणाचा व्हि.डी.ओ. व्हायरल झाल्यानंतर आता म.न.से.च्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी ट्विटरवरुन भास्कर जाधावांना इशारा दिला आहे.