Uncategorized

राज कुंद्रांनी मुंबई पोलिसांना दिली २५ लाखांची लाच; ए.सी.बी.(A.C.B.) ला आलेल्या ई मेल( E mail) मुळे खळबळ

राज कुंद्रांनी मुंबई पोलिसांना दिली २५ लाखांची लाच; ए.सी.बी.(A.C.B.) ला आलेल्या ई मेल( E mail) मुळे खळबळnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnशिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना पोर्नोग्राफी प्रकरणात सोमवारी रात्री मुंबई पोलिसांनी अटक केली.nकुंद्रा यांना गुरुवारी दुपारी पुन्हा वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात आणण्यात आले होते.nदरम्यान, याप्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे.nमुंबई पोलिसांनी राज यांच्याकडून २५ लाखांची लाच घेतल्याच्या आरोपांचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मेल आला आहे.nराज कुंद्रा सध्या २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत आहे.nअँटी करप्शन ब्युरो (ए.सी.बी.)ला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात राज कुंद्रा यांच्यासोबत असलेला आरोपी यश ठाकूर याचे ई-मेल प्राप्त झाले आहेत.nया मेलमध्ये त्यांनी शिल्पा शेट्टी यांचे पती आणि व्यापारी राज कुंद्रा यांनी अटक टाळण्यासाठी मुंबई पोलिस अधिकाऱ्यांना २५ लाखांची लाच दिल्याचे आरोप केले आहेत.nपॉर्न फिल्म प्रकरणातील फरार आरोपी यश ठाकूर यांनी दावा केला आहे की पोलिसांनी राज कुंद्राला यापूर्वीच अटक केली असती.nपोलिसांनीही माझ्याकडूनही लाच मागितली होती,nअसा दावा यश ठाकूर यांनी केला आहे.nयासंदर्भात त्यांनी यावर्षी मार्च महिन्यात महाराष्ट्र अँटी करप्शन ब्युरोला ई मेल लिहून तक्रार केली होती,nतसेच मला अटक होण्यापासून वाचविण्यासाठी माझ्याकडून २५ लाखांची लाच मागितल्याचा आरोप त्यांनी केला आहे.nलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एप्रिलमध्ये हे मेल मुंबई पोलिस आयुक्तांकडे पाठवले होते आणि या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले होते.nयश ठाकूर यांच्याविरूद्ध पॉर्न फिल्म प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *