Uncategorized

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना बाहेर फिरण्याची मुभा द्या; अजित पवारांनी मांडलं स्पष्ट मत

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना बाहेर फिरण्याची मुभा द्या;nअजित पवारांनी मांडलं स्पष्ट मतnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnराज्यात करोनामुळे लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल करावेत,nअशी मागणी जोर धरू लागली आहे.nविशेषत: दुकानांच्या आणि पर्यटनाच्या बाबतीत ही मागणी केली जात आहे.nमात्र रुग्णसंख्येत अपेक्षित घट झालेली नसून, संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका आणि गर्दी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कायम राहतील,nअसे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते.nत्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.nपिंपरी चिंचवड येथे माध्यमांशी बोलताना नागरिकांवरील निर्बंधाबाबत अजित पवारांनी मत मांडले.n“ज्यांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आलेले आहेत अशा नागरिकांना टप्याटप्प्याने बाहेर फिरण्याची मुभा देण्याचा विचार आहे.nहे माझं वैयक्तिक मत आहे.nयासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहे,”nअसे अजित पवार यांनी म्हटलं आहे.nसर्वांनी नियम पाळायला हवेतn– अजित पवारn“काही जणांच म्हणणं आहे की इथून पुढं १०० ते १२० दिवस खूप म्हत्त्वाचे आहेत.nया दिवसांमध्ये नागरिकांनी नियमावलीच तंतोतंत पालन करायला पाहिजे.nपरंतु, ग्रामीण भागात मास्क वापरत नसल्याचं निदर्शनास आलं आहे.nनागरिक विनामास्क असल्याचं चित्र आहे.nएक बाधित व्यक्ती अनेकांना बाधित करू शकते त्यामुळे सर्वानी नियम पाळले पाहिजेत,nअसेही अजित पवार म्हणाले. काही दिवसांपूर्वी,nराज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करोना परिस्थितीवर आरोग्य विभागाच्या वतीने सादरीकरण करण्यात आले होते.nराज्यातील बहुतांश भागांत करोना रुग्णसंख्या कमी झाली असली तरी १० जिल्ह्य़ांत रुग्णसंख्या जास्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *