कोरोनाबाधितांवर “अँटीबॉडी कॉकटेल” उपचार पद्धती प्रभावीnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnकोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत असतानाच,nएक दिलासादायक बातमी समोर आली आहे.nआता कोरोनाबाधित रुग्णांवर “अँटीबॉडी कॉकटेल” उपचार पद्धती प्रभावी ठरत आहे.nनुकत्याच पिंपरी येथीलnडॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय व संशोधन केंद्रामध्ये दोन कोरोनाबाधित रुग्णांना “अँटीबॉडी कॉकटेल” उपचार देऊन पूर्णपणे बरे केले आहे.nमोनोक्लोनल अँटीबॉडीजच्या वापरामुळे हा प्रयोग यशस्वी झाला आहे.nया औषधामध्ये दोन कृत्रिम रेणूंचे मिश्रण आहे,जे कोरोना विषाणूंविरूद्ध नैसर्गिक मानवी प्रतिपिंडांची नक्कल करतात.nहे औषध मोनोक्लोनल अँटीबॉडीज नावाच्या अत्यंत अत्याधुनिक औषधांच्या समूहांपैकी एक आहे.हे विविध प्रकारच्या आजारांविरूद्ध अत्यंत प्रभावी आहेत.nnया उपचार पद्धतीसाठी दोन रुग्ण निवडण्यात आले होते.nयातील एक रुग्ण हा अतिजोखीम गटातील होता तर दुसऱ्या रुग्णामध्ये ताप, थकवा आणि इतर सौम्य लक्षणे दिसून आली होती.nत्यांची काळजीपूर्वक क्लिनिकल ट्रायल्ससाठी निवड करण्यात आली,nया दोन्ही रुग्णांच्या रक्त वाहिनीमध्ये कासिरिव्हीमॅब आणि इंडेव्हिमॅब ही दोन इंजेक्शन्स सोडण्यात आली,nही औषधे शरीरात गेल्यावर विषाणूंना अवरोध करतात त्यामुळे कोरोना विषाणूंना दुसऱ्या पेशीत प्रवेश करता येत नाही व करोना रोखण्यास मदत मिळते. २४ तासाच्या आत या रुग्णांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून आले.nया उपचार पद्धतीद्वारे दोन्ही रुग्णांच्या शरीरातून कोरोनाची लक्षणे गायब झाली,nशिवाय या उपचारपद्धतीमुळे त्यांना इतर कोणता त्रास किंवा दुष्परिणामही झाले नाहीत.nत्यांना १४ दिवस देखरेखीखाली ठेवण्यात आले.n“अँटीबॉडी कॉकटेल” उपचार पद्धतीद्वारे अतिजोखीम गटातील रुग्ण सात दिवसाच्या आत बरे होतात अशी माहिती रुग्णालयाच्या श्वसन विकार विभागाचे प्रमुख डॉक्टरांनी दिली.