Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

समाजाकडुन डाॅक्टरांना वागणूक कशी मिळते ?…..डाॅ.अविनाश भोंडवे

समाजाकडुन डाॅक्टरांना वागणूक कशी मिळते ?…..डाॅ.अविनाश भोंडवेnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnएक जुलैला डॉक्टर्स डे साजरा होतो, डॉक्टरांवर शुभेच्छांचा वर्षाव होतो. पण लोकांचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरला समाजात प्रत्यक्षात कशी वागणूक मिळते हे गेल्या सव्वा-दीड वर्षात आलेल्या अनुभवांवरून… (प्रसंगात साम्य नक्की असणार, पण तो योगायोग नव्हे)nएका कोव्हिड डॉक्टरची रोजनिशीn२० ऑगस्ट २०२०nकाल आईचा फोन होता. “पाच महिने झाले घरी आला नाहीस. पैसेही पाठवले नाहीस मागच्या महिन्यात.” पोटात खड्डा पडला माझ्या, पण मला उत्तर देता आले नाही. काय सांगणार होतो? इथे कोव्हिड वॉर्डात सकाळी ८ पासून रात्री ८ पर्यंत ड्युटी असते. नंतरही पेशंट्स येत राहतात. ४० पेशंट्स आहेत वॉर्डात. शिवाय १० आयसीयु. त्यात जागा नाही, म्हणून सात जण खाली जमिनीवर झोपवलेत. या सगळ्यांना पहायला मी आणि सुधीर आम्ही दोघेच डॉक्टर्स. आणि दोन नर्सेस, एक आया आणि दोन वॉर्ड बॉईज.nसत्तावन्न पेशंट्सचे ऑक्सिजन, बीपी, पल्स, टेम्परेचर तासातासाने पहात राहा. त्यांचे ब्लड घ्या. लॅबला पाठवा. त्यांची सलाइन्स लावा. बंद पडली तर चालू करा. त्यांची औषधे द्या, काही चार तासांनी काही सहा तासांनी, काही बारा तासांनी तर काही चोवीस तासांनी. मग मध्येच पेशंटचा ऑक्सिजन कमी होतोय. त्याचा स्पीड वाढवा. परत चेक करा. परत वाढवा. जे आधीच्या ऑक्सिजन रेटवर स्टेबल आहेत, त्यांचा स्पीड कमी करा. परत बघा. एखाद्याचे अगदी मिनिटाला चाळीस लिटर ऑक्सिजन देऊनही भागात नसेल तर त्याला आयसीयुमध्ये हलवा.nआयसीयूमध्ये व्हेन्टिलेटर लावण्याआधी एंडोट्रकियल ट्यूब त्याच्या तोंडात सोडा. ती घशातून खाली घालणे एक कर्मकठीण काम असते.nयात पुन्हा एखादा पेशंट गेला, तर मग जो कोलाहल होतो. तो कुठेतरी गलबलवून सोडतो. गेल्या पाच महिन्यात पन्नास जणांनी माझ्यासमोर मान टाकली. त्या प्रत्येकात मला माझे बाबा, काका, मामा दिसत होते.nआयुष्य किती नश्वर आहे नाही? ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा…’ डॉक्टर म्हणजे काही देव नाही. माणूसच आहे. त्याचे हातही खूप छोटे आहेत. नाही वाचवू शकत तो मरणासन्न जीवांना. डॉक्टर फक्त रुग्णाचा आजार जाणून घेतो. त्याला औषधे देतो, बरा करणारा ‘तो’ असतो. एकच ट्रीटमेंट… पण कुणी वाचतो कुणी नाही.nसकाळपासून रात्रीपर्यंत कुणी न कुणी पेशंट किंचाळत असतो. एखादे वेळेस सगळा वॉर्डच डॉक्टरांच्या नावाने ठणाणा ओरडत असतो. जेवणाच्या वेळा लक्षात येत नाहीत. सकाळी एकदा पीपीइ किट चढवले की टॉयलेटची शुध्द ही राहत नाही. एकदोनदा मध्यरात्र झालेलीही ध्यानात आली नाही. आसमंतातला अंधार मनात येऊन द्यायचा नाही म्हटले तरी तो आत खोलवर घुसतोय याची पुसटशी जाणीव मनात होत राहतेच.n२७ ऑगस्ट २०२०nसुधीर गेला. माझा डॉक्टर जोडीदार. गेले पाच महिने क्षणोक्षणी माझ्या समवेत काम करणारा माझा फिजिशियन कलीग… आम्हाला सोडून गेला.nचार दिवसांपूर्वी वॉर्डात पेशंटच्या ऑक्सिजनचा रेट वाढवताना तो कोसळला. ओरडा झाला. त्याला बाजूला नेताना लक्षात आले की त्याला कडक ताप होता. त्याचे ग्लोव्हज काढून ऑक्सिजन पाहिला तर ८० टक्के, बीपी ९०-६०, पल्स १३०. आयसीयुची गरज होती. पण आमच्या हॉस्पिटलमध्ये साधा ऑक्सिजन बेड एकच मोकळा होता. आयसीयु शिल्लक नव्हते. त्याला कुठे अॅडमिट करणार? एक ऑक्सिजन सिलिंडर आणून त्याला लावला. सर्व प्रायमरी उपचार बाजूच्या खोलीत सुरु केले. त्याला कोणत्याही हॉस्पिटलात जागा मिळेना. डॉक्टरांसाठी अशी राखीव जागा नसतेच कुठेही; पण राजकीय नेत्यांसाठी असते! हे विदारक सत्यही कळले. चार तासांनी दूरवरच्या एका कुठल्यातरी हॉस्पिटलमध्ये कशीबशी जागा मिळाली. पुढचे चार दिवस त्याने तिथेच काढले.nआज सकाळी तो गेल्याचे कळाले. त्याला मला पाहताच आले नाही. दिवसभर पीपीइ किटमध्ये असताना, मला फोनही करता येत नव्हता आणि घेताही येत नव्हता. सतत त्याचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. एवढे मृत्यू गेल्या पाच महिन्यात पाहिले, मनात कालवाकालव होते, पण डोळे शुष्क राहतात. पण आज हे लिहिताना समोरची अक्षरे धूसर होतायत… डोळ्याच्या कडातून गालावर येणाऱ्या धारा जाणवतायत. मध्येच मला सुधीरची अंत्ययात्र दिसतेय. चारच जण आहेत बरोबर. विद्युतदाहिनी उघडली, त्यात तिरडीवर बांधलेले पार्थिव आत ढकलले. पांढऱ्या प्लॅस्टिकसारख्या वस्त्रात पूर्ण गुंडाळलेल्या ‘बॉडी’मधून अचानक एक डोके बाहेर आले. सुधीर मला हात हलवून गुडबाय म्हणत होता. पण त्याचा चेहरा वेगळाच होता. माझा चेहरा होता तिथे.n२२ सप्टेंबर २०२०nसंध्याकाळी ड्युटी संपल्यावर मोबाईलमध्ये मेसेज वाचले. गेल्या सहा महिन्यात एकूण पाचशे डॉक्टर्स कोव्हिडची ड्युटी करताना कैलासवासी झाले. त्यातले काही आपल्या कुटुंबातील एकमेव पोशिंदे होते. माझ्यासारखेच. सरकारने करोना रुग्णांना सेवा देताना जर डॉक्टरांना मृत्यू आला… तर पन्नास लाख रुपयांचा ‘करोनाकवच विमा’ जाहीर केला होता.nआपल्या राज्यातल्या सेहेचाळीस खाजगी डॉक्टरांना वीरमरण आले होते. पण सरकारने या सर्वांच्या नातेवाईकांचे विमा मिळावा म्हणून केलेले अर्ज नाकारल्याची बातमी त्यात होती. खाजगी डॉक्टरांना विमा संरक्षण लागू नाही असे सरकारचे म्हणणे होते. त्यावर प्रेसिडेंटचे निषेधपत्र, सरकारी अधिकाऱ्यांशी झालेली विफल चर्चा, मंत्रांनी हात वर केले अशा अर्थाच्या पोस्ट्स होत्या. सरकारने सर्व खाजगी हॉस्पिटल्समधल्या ऐंशी टक्के बेड्स अधिग्रहित केली आहेत. करोनाचे ऐंशी टक्के रुग्ण खाजगी हॉस्पिटलमध्ये आहेत. इथलेच रुग्ण वाचतात जास्ती प्रमाणात. पण इथल्या डॉक्टरांनी फी घ्यायची सरकार म्हणेल तितकीच. आणि त्यांना सरकारने दिलेले कर्तव्यपालन करताना मृत्यू आला तर ती सरकारची जबाबदारी नाही. ‘दे आर नॉट आस्क व्हाय? दे आर जस्ट डू अॅण्ड डाय.’n२७ सप्टेंबर २०२०nकाल आयसीयूमध्ये एक पेशंट दगावला. वय पंचावन्न. पेशाने राजकीय कार्यकर्ता. खूप जाडजूड. सोबत खूप वाढलेले बीपी, अनियंत्रित शुगर असलेला मधुमेह. त्याला पाच दिवस ताप येत होता. आयुर्वेदिक काढे घेत होते. मग डॉक्टरांना दाखवले. टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यांना अॅडमिट केले ते अर्धवट शुद्धीत. ऑक्सिजन ७०. सकाळपासून रिसेप्शनला २५-३० फोन आले. वेगवेगळ्या नेत्यांचे आणि दोन-तीन मंत्र्यांचे. दुपारी दोन वाजता दाखल झालेला तो रात्री अकरा वाजता गेला. त्यानंतर पंचवीसएक जण हॉस्पिटलमध्ये घुसले. इमर्जन्सीमधल्या डॉक्टरांना आणि सिस्टर्सना अर्वाच्य शिविगाळ. ओपीडीमधले कागद फाडले. कम्प्युटर्स खाली फेकले. काचा फोडल्या. एका डॉक्टरला, डॉ. राहुलला मारहाण केली. त्याचे डोके फोडले. तो बेशुध्द झाला. आम्ही काम थांबवून राहुलची मलमपट्टी केली. डोक्याचा स्कॅन केला. सुदैवाने मेंदूला दुखापत नव्हती, पण कवटीला फ्रॅक्चर होते. पोलिसांकडे गेलो. पण पहाटेपर्यंत साधी तक्रारही नोंदवून घेतली नाही.nआजच्या पेपरमध्ये डॉक्टरांनी रुग्णाला चुकीची ट्रीटमेंट दिल्याने तो मरण पावला आणि त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने डॉक्टरांना जाब विचारला अशा बातम्या होत्या. तीन-चार टीव्ही चॅनेल्सनी त्यांचाच कित्ता गिरवला. या हॉस्पिटलमध्ये रुग्णांची लूटमार होते. समाजाला लुबाडणारे हे डॉक्टर्स आहेत अशा अर्थाच्या विख्यात नेत्यांच्या बाईट्स होत्या. आज सर्व स्टाफ एकदम शांत होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सुप्त आठ्या होत्या. डोळ्यात राहुलची काळजी होतीच, पण आपले काय होणार याची एक मोठी चिंता होती. आता रात्रीचे दोन वाजलेत, पण झोप येत नाहीये. का आपण डॉक्टर झालो? पैसे तर नाहीच, पण समाधानही नाही. वर गुंडांकडून मारहाण आणि मिडीयामध्ये मानहानी. डॉक्टर्स नाही लुटेरे…. छे. वाटतेय उगीच ही मानवतेची सेवा वगैरे स्वप्ने पाहिली. आयुष्यातील एवढी वर्षे वाया घालवली. समाधान तर राहूद्या पण आत्मसन्मानही दुखावतोय. वाटतेय की आपण डॉक्टर नाही गुन्हेगार आहोत. सर्व समाज आपल्यावर थुंकतोय. का हा पेशा पत्करला आपण? कशाला प्रॅक्टिस करायची? का जगायचे? माझी खोली सातव्या मजल्यावर आहे. माझ्या समोरच्या टेरेसमधून खाली दिसणारी जमीन मला बोलावतेय.nदि. ३ ऑक्टोबर २०२०nआता सकाळी सहा वाजताच आईचा मेसेज वाचला. बाबांना बरे नाहीये. घरी बोलावलेय. मी विचार केला आणि सात वाजता घरी गेलो. आमच्या भागात लॉकडाऊन होता. सर्वत्र शुकशुकाट. घरापाशी गेलो, तर गेट बंद. मी उघडायला गेलो, तर पहिल्या मजल्यावरच्या गॅलरीतून जोशीकाका, आमच्या हाऊसिंग सोसायटीचे सेक्रेटरी, ओरडले.n”डॉक्टर आत येऊ नका.”nमी प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहिले.n”तुम्ही कोव्हिड हॉस्पिटलमध्ये काम करताय. आत आलात तर आमच्या सोसायटीत कोव्हिड पसरेल. सोसायटीत चाळीस जण सिनिअर सिटिझन आहेत. पन्नास लहान मुले आहेत. त्यांच्यात तुमच्यामुळे आजार पसरेल. आत येऊ नका.”nजोशीकांचा आवाज ऐकून आणखीन सात-आठ खिडक्या उघडल्या. “डॉक्टर आत येऊ नका.” सगळ्यांचाच कुत्सित घोष. नजरांमध्ये मीच करोनाचा व्हायरस असल्यासारखा भाव.nमाझ्या आईने विनवून सांगितले, “बाबांना बरं नाहीये म्हणून बोलावलेय.”n”मग अॅम्ब्युलन्स बोलवा आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. इथे करोना नकोय.”n”तुम्ही डॉक्टर आहात, कळत नाही तुम्हाला कसे वागायचे? आमच्या सोसायटीत बाहेरून येणाऱ्यांना बंदी आहे. आम्ही कुणी बाहेर जात नाही. कुणालाही येऊन देत नाही.”nदोन वर्षापूर्वी याच जोशीकाकांना रात्री अडीच वाजता हार्ट अॅटॅक आला म्हणून मी स्वतः हॉस्पिटलात घेऊन गेलो होतो. पूर्ण घामाने चिंब आणि बेशुद्धावस्थेच्या काठावर होते. रात्रीत त्यांची इमर्जन्सी अॅन्जियोप्लास्टीदेखील केली होती. खिडकीतून कुचक्या वाक्यांची पिंक टाकणारे प्रत्येक कुटुंब त्यांच्या आजारात माझ्याकडून हक्काने औषधे घेऊन जात होते. कोणतीही फी न देता. मार्चमध्ये थाळ्या वाजवल्या तेंव्हा यांनीच मला तुम्ही करोनायोद्धे आहात असे फोन करकरून सांगितले होते. आणि आज मला तेच लोक माझ्याच घरात येण्यापासून बहिष्कृत करत होते. माझा गुन्हा काय? तर मी डॉक्टर आहे आणि करोनाने मरायला टेकलेल्या माणसांवर उपचार करतोय. रात्रंदिवस तिथे राहून.nआपल्याबाबत लोक किती हीन भावना बाळगून आहेत, याची प्रथमच जाणीव झाली मला. डॉक्टरचे तोंडावर कौतुक करणारा माणूस प्रत्यक्षात किती स्वार्थी असतो, फक्त स्वतःचाच विचार करतो. हे समजले मला त्यादिवशी. ‘वैद्यकीय सेवा ही मानवतेची सेवा असते’ या वाक्यातला फोलपणा ध्यानात आला. आजवर जपलेल्या मूल्यांवरचा विश्वासच उडाला. डॉक्टरांना तोंडावर बोलताना देव म्हणणारी जनता त्यांना माणूस म्हणूनही जगून देत नाही, हे कळले. माझी मलाच किळस आली. छी! मी एक डॉक्टर आहे… किती घाण…n२७ ऑक्टोबर २०२०nतीन दिवस मी सुट्टीवर आहे. जेवणावर वासनाच नाही. परवा एक वडापाव खाल्ला होता, तेवढाच. आंघोळही करावीशी वाटली नाही. कशाला करायची. आरशात पाहिले. दाढी वाढलेला, केस विस्कटलेला मळक्या कपड्यातला मीच आहे का?nआमचे सायकियाट्रिस्ट डॉ. माने जरा विनोदीच आहेत. म्हणतात,”टेन्शन घेऊ नको या पाच गोळ्या रोज तीन वेळा घे”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *