Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयाची ट्रेनिंग व प्लेसमेंट मध्ये उत्तुंग भरारी ! मागील दोन वर्षांमध्ये 630 विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंट द्वारे नोकरीची संधी !

माळेगाव अभियांत्रिकीnमहाविद्यालयाची ट्रेनिंग व प्लेसमेंट मध्ये उत्तुंग भरारी !nमागील दोन वर्षांमध्ये 630 विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंट द्वारे नोकरीची संधी !nnसंतोष भोसले ( शिव-कल्याणन्युजनेटवर्क )nnमाळेगाव ( ता बारामती) येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालय हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मागील 30 वर्षापासून तंत्रशिक्षणात दर्जेदार कामगिरी करणारे नामांकित महाविद्यालय असून चालू शैक्षणिक वर्षांमध्ये पुणे जिल्हा ग्रामीण भागामधील सर्वाधिक प्लेसमेंट देणारे महाविद्यालय म्हणून नावलौकिक मिळवलेला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन क्रियाशील उपक्रम राबवण्यासाठी माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालय नेहमीच अग्रेसर असते.सर्व क्षेत्रात यशस्वी असणारे उत्कृष्ट विद्यार्थी घडविण्यासाठी माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयाचा नावलौकिक आहे. याचाच परिपाक म्हणून मागील दोन शैक्षणिक वर्षांमध्ये महाविद्यालयातील 630 विद्यार्थ्यांची  विविध क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंटद्वारे निवड झाली.तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांकडून ऑनलाईन शिक्षण व टीचिंग लर्निंग प्रक्रियेचे उत्कृष्ट नियोजन केल्याने विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या विविध संधी उपलब्ध होत असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम. मुकणे यांनी दिली.nसदर विद्यार्थ्यांच्या निवडीची प्रक्रियाnॲप्टिट्यूड टेस्ट , टेक्निकल इंटरव्ह्य़ू व पर्सनल इंटरव्ह्यू या तीन स्तरांवर मूल्यांकन करून संपन्न झाली.निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक 3 लाखापासून ते 10 लाखांपर्यंत वेतन कंपनीतर्फे देण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच  रोजगारक्षम बनवणारे कौशल्य विकसित करण्यासाठी माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये विविध विषयांवर आधारित कार्यशाळांचे तसेच विविध वेबिनार मालिकांचे महाविद्यालयामार्फत आयोजन करण्यात येत असल्याची माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ. माधव राउळ यांनी दिली. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अभियांत्रिकी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत आहेत. विद्यार्थ्यांना या संधीचे सोने करता यावे , यासाठी महाविद्यालयातील ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग सातत्याने प्रयत्न करत आहे. आतापर्यंत एकूण 110 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये विशेषतः इन्फोसिस , टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस , विप्रो ,  पर्सिस्टंट , वनकोड , एमटेक ,टेक महिंद्रा ,   अल्फा लावल , एक्सेनचर  ,  कॉग्निझंट , रिलायन्स जिओ , किर्लोस्कर ब्रदर्स , कॅपजेमिनी , एसीसी सिमेंट  , ॲमेझॉन ,  सिंटेल  इत्यादी कंपन्यांचा समावेश झाला. महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांना वेळोवेळी विविध कार्यशाळांचे व प्रशिक्षणाचे आयोजन होत आहेत याचाच परिणाम म्हणून विद्यार्थ्यांमध्ये स्किल डेव्हलपमेंट व कम्युनिकेशन डेव्हलपमेंट  नवीन येणाऱ्या टेक्नॉलॉजी नुसार होत असल्यामुळे कंपन्यांच्या निवडीच्या प्रक्रियेमध्ये  जास्तीत जास्त विद्यार्थी यशस्वी होत आहेत. नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांची होणारी निवड महाविद्यालयाच्या आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर शिक्कामोर्तब करते. विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये  प्राचार्य , सर्व विभाग प्रमुख , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा महत्त्वाचा सहभाग आहे.nनिवड झालेल्या विद्यार्थ्यांचेnशिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष व माळेगाव सहकारी  साखर कारखान्यांचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे , कारखान्याचे उपाध्यक्ष बन्सीलाल आटोळे , संचालक मंडळ , विश्वस्त वसंतराव तावरे ,अनिल जगताप ,महेंद्र तावरे , रामदास आटोळे ,गणपत देवकाते ,रवींद्र थोरात , सीमा जाधव , चैत्राली गावडे  व संस्थेचे सचिव प्रमोद शिंदे यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *