गांजा लागवडीची परवानगी दया!nnबाभळी गावचे शेतकरी भाऊराव शिंदे यांची मागणीnnशिव-कल्याण न्यूज नेटवर्कnnआयुर्वेदिक वनस्पती असलेल्या गांजा या पिकाची लागवड करण्यास महाराष्ट्र राज्यात बंदी आहे,या वनस्पती औषध कंपन्यांनाकडून मागणी होत असते,त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू शकतो,हा अपेक्षेने कळमनुरी तालुक्यातील बाभळी गावचे शेतकरी भाऊराव शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे.nnशेतकरी भाऊराव शिंदे यांच्या म्हणण्यानुसार शेतात कोणतेही पीक घेतले तरी शेती तोट्यात जाते,यातून बाहेर पडण्यासाठी गांजा लागवडीस परवानगी मिळावी,असे निवेदन केले आहे.