*पोलीस महासंचालक पदक विजेते इक्बाल शेख सारखे पोलीस सोलापूरचे भूषण आहेत*
nn*शहर शिवसेनेने केला सन्मान*nnसोलापूर – सोलापूर ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असणारे इक्बाल अ. रशीद शेख यांनी कमी वयात नेत्रदीपक कामगिरी बजावत देशपातळीवर सोलापूरचा झेंडा फडकविला आहे असे गौरवोद़्गार शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी काढले.nशहर शिवसेनेच्या वतीने आयोजित इक्बाल शेख यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.nसन्मानचिन्ह, शाल व नॕपकीन बुके देऊन शेख यांचा कार्यक्रमाचे आयोजक शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर व जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.nयाप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, शंकर चौगुले, भीमाशंकर म्हेत्रे, बाळासाहेब माने, सिध्दू घोडके, सचिन गंधुरे, सुनील बळी, अनिल जमादार, सिध्दाराम खजुरगी, बसवराज जमखंडी,रवि कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.nपुढे बोलताना पुरुषोत्तम बरडे म्हणाले की,nअशाप्रकारचा सत्कार हा केवळ एका व्यक्तीचा सत्कार नसतो,nतर तो त्याच्या आईवडिलांनी केलेल्या संस्कारांचा सत्कार असतो.nआजपर्यंत १० सुवर्ण, ७ रौप्य, ११ कांस्य व एक राष्ट्रीय पारितोषिक पटकावणारा, क्राईम ॲण्ड क्रिमिनल ट्रॕकिंग नेटवर्किंग सिस्टम ( सी.सी.टी.एन.एस.)n(C.C.T.N.S.) विशेष उल्लेखनीय कर्तबगारी बजावणारे इक्बाल शेख यांच्या सारखे पोलीस आपल्या परिसरात राहतात हे आपलं भाग्यच आहे .nअसं प्रतिपादन शिवसेना शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर यांनी केलं.nते म्हणाले की, निवृत्ती जवळ आल्यानंतर सेवा कार्यकाळ निष्कलंक पार पडलेल्यांना राज्याच्या सर्वोच्च पोलीस महासंचालक पदाने गौरविले जाते,nमात्र उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर अल्पावधीतच हे पदक पटकाविणारे इक्बाल शेख म्हणजे सोलापूरचे भूषणच होय.nगणेश वानकर यांनीही अहमद जावेद यांच्या कार्याचा दाखला देत शेख यांना शुभेच्छा दिल्या.nn=================nn*हा सत्कार माझ्यासाठी खूप विशेष : इक्बाल शेख*nnआजवर परजिल्ह्यात, परराज्यात अगदी मुख्यमंत्र्यांपासून, डी.जी.पी.(D.G.P.),एस.पी.(S.P.) आदी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते माझा सत्कार झाला.nमात्र, शिवसेनेनं केलेला हा सत्कार माझ्यासाठी अतिशय विशेष आहे.nकारण पहिल्यांदाच माझ्या जन्मदात्या आई-वडिलांसमोर माझा सन्मान माझ्या लोकांकडून होतोय.nआणि हा सन्मान माझ्या जन्मदिनी होत असल्याने हा दुग्धशर्करा योग जुळून आला असं वाटतं.nn⭕ इकबाल अ. रशीद शेखnपोलीस हवालदार, सोलापूर ग्रामीण.