Uncategorized

रेडणी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

रेडणी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसnnसचिन तरंगे(शिव-कल्याण न्यूज नेटवर्क)nnमे महिन्याच्या अखेरीस रेडणी व लगतच्या गावात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला,त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतातील उभ्या पिकाना जीवदान मिळाले आहे.त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे,एकंदरच बळी राजा सुखावला आहे.nउन्हाळी हंगामातील विविध पिके शेतकरी घेत असतो,सद्या ऊस बांधणी जोरात सुरू असल्याने पाऊसाचा फायदा झालाच आहे.nपरंतु अचानक आलेल्या या पावसामुळे गुराखी,मशागत करणारे शेतकरी,मजूर यांची तारांबळ उडाली.nऊस,कडवल,या पिकांना फायदा झाला तर डाळिंब,आंबा ,या पिकाचे नुकसान झाले.nअचानक आलेल्या वादळी वाऱ्या मुळे तोंडले या वेलवर्गीय भाज्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले,या पिकासाठी केलेले मांडव भुईसपाट झाल्याने आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे.यामुळे शेतकरी हतबल झाला आहे तर ऊस, कडवळ या पिकांना फायदा झाल्याने काही शेतकऱ्यांत उत्साह दिसून आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *