शिवसेना तालुका प्रमुख पदी रामचंद्र जामदारnn
nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnशिवसेना इंदापूर तालुका प्रमुख पदी बेलवाडी ( तालुका इंदापूर ) येथील रामचंद्र विठ्ठलराव जामदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.nnमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, शिवसेना नेते रामदास कदम, शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीना कांबळी यांच्या सूचनेवरून तसेच शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या आदेशाने जामदार यांची इंदापूर तालुकाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.nnजिल्हाप्रमुख महेश पासलकर, महिला आघाडी जिल्हा संघटिका सीमा कल्याणकर, अण्णासाहेब काळे, धनंजय पवार, अनिल कदम, प्रकाश शेळके यांच्या उपस्थितीत जामदार यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.