Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

प्राचार्य डॉ. देविदास भीमराव वायदंडे यांचा”विश्वास गौरव” पुरस्काराने सन्मान

nnप्राचार्य डॉ. देविदास भीमराव वायदंडे यांचा”विश्वास गौरव” पुरस्काराने सन्मानnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnइंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय,कळंब-वालचंदनगर अंतर्गत सन 2024 -25 “विश्वास गौरव” पुरस्कार प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक संस्थेचे सचिव,वीरसिंह रणसिंग यांनी केले.रणसिंग कुटुंबियांचा इतिहास तसेच “विश्वास गौरव” पुरस्कार देण्यापाठीमागची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. पुरस्काराचे स्वरूप शाल, पुष्पगुच्छ,मानपत्र व सन्मानचिन्ह असे असून या पुरस्काराचे पहिले मानकरी प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे हे आहेत असा उल्लेख त्यांनी केला.nnप्राचार्य डॉ. देविदास वायदंडे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, व्यवस्थापन परिषद सदस्य अधिसभा सदस्य तसेच ग्रंथ निवड समिती महाराष्ट्र शासन सदस्य अशा अनेक राज्यशासन आणि केंद्र शासनाच्या विविध समित्यांवर सदस्य म्हणून नियुक्त आहेत.nnमहाविद्यालयाचे उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग सर यांनी मानपत्राचे वाचन केले. संस्थेच्या अध्यक्ष, आनंदी विश्वासराव रणसिंग, उपाध्यक्ष -प्रकाश बुवासाहेब कदम, सचिव-वीरसिंह रणसिंग विश्वस्त- कुलदीप हेगडे, विश्वस्त- शंकरराव रणसिंग तसेच रणसिंग कुटुंबियांचे स्नेही आत्या कमल घाडगे,उर्मिला माने देशमुख आणि विकास रणसिंग व रामभाऊ रणसिंग या पुरस्कार वितरण सोहळ्यात उपस्थित होते.nnदरम्यान महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रज्योती बापूराव बोबडे (सीए) झाल्याबद्दल त्यांचे संस्था आणि महाविद्यालयाच्या वतीने यथोचित सन्मान आणि सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर म्हणून प्रज्योतीने आपले मनोगत व्यक्त केले. दरम्यान संस्थेच्या वतीने इंदापूर तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला. विश्वासराव रणसिंग (दादा)यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. ज्ञानदीप ब्लड सेंटर नातेपुते यांच्या सहयोगाने आयोजन केले. यामध्ये रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपला सहभाग नोंदवला. संस्थेच्या अध्यक्ष, श्रीमती.आनंदी विश्वासराव रणसिंग यांच्या हस्ते महाविद्यालयामध्ये “स्मार्ट क्लासरूमचे” आणि महाविद्यालयाच्या जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या “छायाचित्रण प्रदर्शनाचे”उद्घाटन करण्यात आले. तसेच महाविद्यालयात ग्रीन क्लब तर्फे 2000 वृक्षांचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, विश्वस्त आणि नातेवाईक तसेच महाविद्यालयातील विभागप्रमुख प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.n

या कार्यक्रमाचे आभार प्रभारी प्राचार्य डॉ.विजय केसकर यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ.विलास बुवा आणि डॉ.प्रशांत शिंदे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *