Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पहिले अश्व रिंगण बेलवाडीत

nnश्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पहिले अश्व रिंगण बेलवाडीतnnअसा रिंगण सोहळा, सरतील घटका तिपळा ॥ आस तुझ्या दर्शनाची, जिव विठ्ठल सावळा ॥nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क, वालचंदनगर प्रतिनिधी ) प्रसाद तेरखेडकरnnजगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने रविवार ( ता. 7) सणसर ( ता. इंदापूर ) येथील मुक्काम आटपून सोमवारी सकाळी अंथुर्ण ( ता. इंदापूर ) मुक्कामाकडे प्रस्थान केले. दरम्यान सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास बेलवाडी येथे या पालखी सोहळ्यातील अश्वाचे पहिले नेत्रदीपक व रोमहर्षक गोल रिंगण पार पडले.nnसणसर येथील मुक्काम आटपून जगतगुरुंची पालखी सकाळी ठीक साडेआठ वाजता बेलवाडी येथील पालखी मैदानावर आली. पालखीचे व पालखी प्रमुखांचे बेलवाडी ग्रामस्थांनी परंपरेनुसार जोरदार स्वागत केले. ‘साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा’ या वचनाप्रमाणे बेलवाडी गावात सोमवारी आनंदाचे व उत्साहाचे वातावरण होते.nnप्रथेनुसार पालखी सोहळ्याला पहिल्यांदा मेंढ्यांनी प्रदक्षिणा पूर्ण केली. नंतर झेंडेकर्‍यांनी प्रदक्षिणा पूर्ण केली. नंतर डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिलांनी हरिनामाच्या गजरात प्रदक्षिणा पूर्ण केली. नंतर विणेकर्‍यांनी देखील प्रदक्षिणा पूर्ण केली.तसेच पोलीस कर्मचारी यांनी देखील या पालखी सोहळ्यास प्रदक्षिणा पूर्ण केली. मृदुंग वादक टाळकरी यांनी देखील प्रदक्षिणा पूर्ण केली. या सर्वांनी प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर गोल रिंगण सोहळ्याच्या नेत्रदीपक सोहळ्यासाठी अश्वाला पूजन करण्यासाठी आणण्यात आले. पूजन झाल्यावर आश्वाच्या रिंगण सोहळ्याला सुरुवात झाली.मानाच्या आश्वाची भरधाव वेगातील प्रदक्षिणा सुरू झाली. अश्वांनी तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्या. यावेळी ज्ञानोबा तुकाराम पंढरीनाथ महाराजांच्या जय घोषाने संपूर्ण आसमंत दुमदुमून गेला. आणि या ठिकाणचे संपूर्ण वातावरण हरिनामाच्या जयघोषात व भक्तीरसात न्हाऊन निघाले. अश्वाच्या टाचेखालील माती घेऊन ती कपाळाला लावण्यासाठी हरिभक्तांनी गर्दी केली. सोहळ्यातील पहिले गोल रिंगण व दुपारचा विसावा संपवून पालखी सोहळा पुढील मुक्कामीसाठी अथुणे कडे मार्गस्थ झाला. वाटेत लासुर्णे,जंक्शन,येथे दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. वाटेत ठिकठिकाणी वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध संघटनांनी चहा फळे नाष्टा व भोजनाची व्यवस्था केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *