शिष्यवृत्ती परीक्षेत जि.प.शाळा, लालपुरीच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश
nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnकळंब ( ता.इंदापूर ) येथील लालपुरीच्या जि.प.शाळेच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेकडुन घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा-२०२२ मध्ये उज्ज्वल यश संपादन केले.nnपरीक्षेत बसलेल्या अकरा विद्यार्थ्यांपैकी पाच विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाले. शाळेचा शेकडा निकाल ४५ टक्के लागला.nपात्र विद्यार्थ्यांना २९८ पैकी पुढील प्रमाणे गुण मिळाले.nआर्यवीर संदीप येवले – २५२nप्रांजली श्रीरंग वाघमोडे – १७४nकार्तिकी किसन निटवे – १७२nश्रेया बाळासाहेब अर्जुन – १४०nरूतुजा संभाजी बंडगर – १२८nnशाळेचे मुख्याध्यापक अनिल दिवसे, वर्गशिक्षक संदीप येवले, सहकारी शिक्षक सहदेव शिंदे, अजित भोसले, अलका ठोंबरे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच केंद्र प्रमुख मारूतराव सुपुते, सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, ग्रामस्थ आदींनी या यशाबद्दल कौतुक केले.