Uncategorized

कृषी दिनानिमित्त कृषी कन्यांकडून ‘चर्चासत्र’ संपन्न ! 

कृषी दिनानिमित्त कृषी कन्यांकडून ‘चर्चासत्र’ संपन्न !nnnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nn१ जुलै २०२४, मौजे खुंटे, ( ता.फलटण , जि.सातारा ) गावामध्ये कृषी दिनानिमित्त डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय बारामतीच्या कृषी कन्यांनी शेतकऱ्यांसाठी खास मार्गदर्शन सत्र आयोजित केले होते. तसेच रांगोळीद्वारे गावचे चित्र रेखाटले . ह्या मार्गदर्शन सत्रामध्ये कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ श्री. संतोष गोडसे सर यांनी शेतकऱ्यांना खरिफ हंगामातील शेतीचे नियोजन तसेच शेती मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या विषयावर मार्गदर्शन केले.nnकृषी दिनाचे औचित्य साधून कृषीकन्या कु.साक्षी दळवे , कु. सुस्मिता कारंडे, कु. सायली काटे, कु.प्रगती पाटील, कु. वैष्णवी पाटील आणि कु.पूजा फडतरे यांनी माध्यमिक विद्यालयामध्ये निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. या प्रसंगी गावचे सरपंच श्री. हणमंत भिसे,उपसरपंच सौ.रुपाली खलाटे , कृषीसेवका तृप्ती शिंदे , ग्रामसेवक श्री अंगराज जाधव , वि.का.स .चे चेअरमन श्री .अविनाश खलाटे उपस्थित होते.nnया कार्यक्रमाच्या नियोजनासाठी कृषीकन्यांना गावातील प्रगतशील शेतकरी श्री. मच्छिंद्र खलाटे, श्री.तानाजी खलाटे, श्री.नारायण जगताप , श्री.रामराजे खलाटे , रोहित खलाटे , श्री.संदीप तोरसकर व विद्यालयातील सर्व शिक्षकांचे सहकार्य मिळाले. या चर्चासत्राला खुंटे गावातील सर्व शेतकऱ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *