श्रीराम मंदिरात वामन तात्यांची जन्म शताब्दी साजरी !nn
nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnकळंब ( ता.इंदापूर ) येथील वामन मारूती वाघ ( तात्या ) यांची जन्म शताब्दी श्रीराम मंदिरात साजरी करण्यात आली.nnश्रीराम मंदिर ट्रस्ट, चैतन्य जप संकुल व श्रीराम भजनी मंडळाच्या वतीने गुरुवार, ( दि. २७ जुन ) रोजी वामन तात्यांची जन्म शताब्दी विठ्ठल-रुक्मिणी यांची मुर्ती, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन साजरी केली. यावेळी वामन तात्यांचे चिरंजीव सुहास काका, सौ.माणिक काकी उपस्थित होते.nnकार्यक्रम प्रसंगी श्रीमती. शालिनी पाटील, रत्नप्रभा चव्हाण, सौ.लोहार,सौ.सुशिला भोसले, सौ.थोरात,सौ.रजनी चव्हाण, सौ.कुंभार, सौ.घोगरे, सौ.सत्वशिला चव्हाण, सौ.कल्याणकर आदी महिला वर्ग व प्रदीप कल्याणकर, सुधीर डोंबाळे, अनंत इंगळे, शिवाजी चव्हाण, प्रदिप तेरखेडकर, महेश प्रभुणे, बब्रुवान सुतार, सुदाम घाडगे, विलास डोंबाळे, सुनिल मस्के, मनिष जकातेकाका, अमेय चव्हाण आदी ग्रामस्थ उपस्थित होते.