कळंब गावात ‘कृषीदूतां ‘चे स्वागत!
nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnअत्याधुनिक तंत्रज्ञानाने गावची शेती, आणि समृद्ध विचाराने लोकांचे विचार परिवर्तन करण्यासाठीnबारामतीच्या डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील कृषीदूतांचे कळंब (ता. इंदापूर) गावात स्वागत करण्यात आले.nnकळंब ग्रामस्थांकडून कृषी दूतांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.nnशेतकर्यांची व निसर्गाची पिढ्यान-पिढ्या असलेली बांधिलकी नव्या पिढीला कळावी म्हणून निसर्गाचे प्रतीक असलेले रोप कृषी दूतांनी ग्रामस्थांना देऊन त्यांना सन्मानित केले.nnया प्रसंगी कृषीदूत ,कृष्णा रेड्डी, विराज पवार, प्रितम कादे, केदार पाटील, रेवण थोरात, धनराज सावळगी, अजिंक्य जाधव, प्रथम राठी उपस्थित होते.nnकृषीदूतांना संस्थेचे मुख्याधिकारी प्रा.एस. पी. गायकवाड सर व एस. व्ही. बुरुंगळे सर तसेच कळंब मधील निवृत्त कृषी सहाय्यक मधुकर भोसले तसेच राजरत्न कृषी सेवा केंद्राचे अक्षय सुधीर डोंबाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.nnकार्यक्रमावेळी कळंब सहकारी सोसायटीचे मा.चेअरमन तथा विद्यमान व्हा.चेअरमन संजय खरात, संचालक श्रीकृष्ण बेलपत्रे, बलभीम जाधव, शिराळकर काका, किसन जाधव, दत्तात्रय शेंडगे, बब्रुवान सुतार, राजेंद्र बनसोडे, वणवे, घाडगे, संजय कांबळे, तसेच श्रीमती.भारती डोंबाळे, सौ.बेलपत्रे, सौ.शिराळकर, समिना सय्यद, सौ.बामणे, सौ.जाधव यांचे व मान्यवरांचे सहकार्य मिळाले.