माध्यमिक विद्यालय तावशी व माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी इ १० वी चा निकाल १०० टक्केnn
nnतावशी विद्यालयाचा इ १० वी चा सलग दहाव्यांदा १०० टक्के निकालnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnइंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित माध्यमिक विद्यालय म्हसोबाची वाडी व माध्यमिक विद्यालय तावशी ता इंदापूर जि. पुणे या विद्यालयाचा इयत्ता १० वी चा १०० टक्के निकाल लागला. माध्यमिक विद्यालय तावशी विद्यालयाचा सलग दहाव्यांदा शंभर टक्के निकाल लागल्याने परिसरात यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन होत आहे.nnमाध्यमिक विद्यालय तावशी यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे:nउत्कर्षा अशोक धुमाळ प्रथम क्रमांक ४४२ गुण ८८ टक्के,nगौरी गजानन राऊत द्वितीय क्रमांक ४२५ गुण ८५ टक्के,nभाग्यश्री भारत माने तृतीय क्रमांक ४०९ गुण ८१ टक्के गुण मिळविले.nमाध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणेnकु गौरी राजाराम तावरे प्रथम क्रमांक ४४३ गुण ८८ टक्के, आर्यन शरद घोलप द्वितीय क्रमांक ४१६ गुण ८३ टक्के,समीक्षा किसन सूर्यवंशी तृतीय क्रमांक ४११ गुण ८२ टक्के गुण मिळविले.nnतावशी विद्यालयाचे मुख्याध्यापक मारुती वणवे ,शिक्षक झुंबर पवार ,उषा बर्गे,मंगल सूर्यवंशी,बाळू कदम, माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी मुख्याध्यापक प्रमोद भोंग , शिक्षक लक्ष्मण पानसरे, हेमंत मासाळ ,अमृता सरक महादेव बागल या सर्व शिक्षकांचे व यशस्वी विद्यार्थी यांचे संस्था अध्यक्षा आनंदी रणसिंग,उपाध्यक्ष प्रकाश कदम ,खजिनदार हणमंतराव रणसिंग ,सचिव विरसिंह रणसिंग, विश्वस्त शिवाजीराव रणवरे ,कुलदिप हेगडे ,शंकरराव रणसिंग,वीरबाला पाटील,राही रणसिंग यांनी अभिनंदन केले.