Uncategorized

इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला

इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर प्राणघातक हल्लाnnnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnइंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अद्याप हल्ले करांनी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास संविधान चौकात प्राणघातक हल्ला केला. चौकात तहसीलदारांची गाडी आली असता अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर लोखंडी राॅडने जोरदार हल्ला चढविला. यानंतर संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.nnनेहमीप्रमाणे तहसीलदार श्रीकांत पाटील इंदापूर प्रशासकीय भवन येथे निघाले होते. संविधान चौकात त्यांची गाडी आल्यानंतर नंबर प्लेट नसलेल्या चार चाकी गाडीतून एक हल्लेखोर खाली उतरून लोखंडी रॉड ने थेट हल्ला करून गाडीची मोडतोड केली व अंगावर मिरचीची पूड उधळली. त्यावेळी गाडीत तहसीलदार व चालक होते. अजून तीन हल्लेखोर गाडीतून उतरून त्यांनी धक्काबुक्की करून फरार झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *