Uncategorized

दत्त देवस्थान हेच समाज संस्कारांचे प्रेरणास्थान – सारिकाताई भरणे

दत्त देवस्थान हेच समाज संस्कारांचे प्रेरणास्थान – सारिकाताई भरणेnnimg 20251228 071339nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnइंदापूर(प्रतिनिधी):आध्यात्मिक श्रद्धा, सामाजिक बांधिलकी आणि लोककल्याणाचा संवेदनशील दृष्टिकोन यांचा सुरेख संगम शनिवारी श्री दत्त देवस्थान,शहाजीनगर (रेडा) येथे अनुभवास आला.राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या सुविद्य पत्नी सौ. सारिकाताई भरणे यांनी शनिवार,दि. २७ डिसेंबर रोजी श्री दत्त देवस्थानला सदिच्छा भेट देत श्री दत्तचरणी दर्शन घेतले.nnया वेळी दत्तभक्त परिवाराच्या वतीने दत्त देवस्थानचे प्रमुख नीलकंठ मोहिते व तानाजी गायकवाड यांनी सारिकाताई भरणे यांचे भक्तिभावाने व पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. देवदर्शनानंतर त्यांनी मंदिर परिसराची पाहणी केली.तसेच दत्त देवस्थानमार्फत वर्षभर राबविण्यात येणारे धार्मिक, सामाजिक व अध्यात्मिक उपक्रम,अखंड अन्नदान सेवा,तसेच विविध समाजोपयोगी उपक्रमांची सविस्तर माहिती त्यांनी जाणून घेतली.nnयावेळी बोलताना सारिकाताई भरणे म्हणाल्या,श्री दत्त देवस्थान हे केवळ धार्मिक स्थळ नसून समाजसंस्कारांचे प्रेरणास्थान आहे.दत्त देवस्थानमुळे काटी–शहाजीनगर परिसरात आध्यात्मिक चैतन्य निर्माण झाले असून, भक्ती आणि श्रद्धेची ही जोडच आपली संस्कृती आणि संस्कार टिकवून ठेवते.nसमाजातील प्रत्येक घटकापर्यंत सेवा, संस्कार आणि श्रद्धेचा संदेश पोहोचवणारे देवस्थानचे कार्य निश्चितच आदर्शवत असून,असे उपक्रम समाजाला योग्य दिशा देणारे असल्याचे त्यांनी नमूद केले.nदेवस्थानमार्फत सुरू असलेल्याnपौर्णिमा कालावधीत अखंड अन्नदान सेवेचे त्यांनी विशेष शब्दांत कौतुक केले. भुकेल्याला अन्न देणे हीच खरी मानवसेवा असून,अशा सेवेमुळे समाजात माणुसकी, समता आणि सहभावना अधिक बळकट होते,असे गौरवोद्गार त्यांनी काढले. अध्यात्मिक मूल्यांतून सक्षम नेतृत्वnराजकीय क्षेत्रातील जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकी यांची सांगड घालताना आध्यात्मिक मूल्ये हीच सक्षम, संवेदनशील आणि लोकाभिमुख नेतृत्वाची खरी ताकद असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *