Uncategorized

छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार व विचार आत्मसात करा – प्रा. नितीन बानगुडे-पाटील

छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार व विचार आत्मसात करा – प्रा. नितीन बानगुडे-पाटीलnकळंबच्या सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाकडून देश व राष्ट्र सेवेत कार्यरत असलेल्या युवकांचा गौरव संपन्नnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnमंगळवार, दि.२७, कळंब (वालचंदनगर) ता.इंदापूर : आजच्या तरुण युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन शिवाव्याख्याते प्रा.नितीन बानगुडे-पाटील यांनी केले.nते कळंब (ता इंदापूर ) येथे सार्वजनिक शिवजयंती मंडळाकडून आयोजित केलेल्या “शिवव्याख्यान” कार्यक्रमात बोलत होते.nआजची तरुणाई भरकटत चालली आहे, समाजात अशांताता निर्माण झाली आहे, युवकांचे वाचन खूपच कमी आहे, युवकांनी राजा शिवछत्रपती, शंभूराजे, यांचे विचाराने चालले पाहिजे.nnमोघलांनी मोगलशाही, आदिलशाही, निजामाने निजामशाही, कुतूबशहाने कुतूबशाही स्थापन केली, परंतू छत्रपती शिवाजी राजांनी ” रयतेचे स्वराज्य ” स्थापन करून त्याचे सुराज्य केले. याचा विचार सर्वांनी आचरणात आणला पाहिजे.nnकार्यक्रमात सुरुवातीस शिवव्याख्याते बानगुडे-पाटील यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने सोपान टांगडे , शिंदे व आयोजकांकडून फेटा, हार व श्रीफळ देऊन करण्यात आला.nतसेच यावेळी परिसरातील देश व राष्ट्र सेवेत कार्यरत असलेल्या अधिकारी,भारतीय सेना,महाराष्ट्र पोलीस, व राष्ट्रीय खेळाडू यांचा गौरव गुलाबपुष्प व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.nफडतरे नाॅलेज सिटीचे अध्यक्ष व सर्वेसर्वा उत्तमदादा फडतरे व पत्रकार यांनाही सन्मानित करण्यात आले.nnकार्यक्रम यशस्वी करणेसाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमांस बहुसंख्येने ग्रामस्थ व परिसरातील शिव-प्रेमी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *