Uncategorized

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आश्रम शाळा एकशिव येथे शालेय विद्यार्थ्यांना खाऊ व शालेय साहित्यांचे वाटप

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आश्रम शाळा एकशिव येथे शालेय विद्यार्थ्यांना खाऊ व शालेय साहित्यांचे वाटपnnnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnमौजे कळंबोली तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे सालाबादप्रमाणे दरवर्षी कळंबोली ग्रामविकास प्रतिष्ठान तर्फे श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते. कारण आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने यावेळी श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 जयंती निमित्त सामाजिक बांधिलकी जपत आश्रम शाळा एकशिव येथील विद्यार्थ्यांना खाऊ व शालेय साहित्यांचे वाटप कळंबोली ग्रामविकास प्रतिष्ठान कळंबोली यांच्यातर्फे करण्यात आले. यावेळी प्राध्यापक अनिल वाघमोडे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.nnयावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार रामहरी रुपनवर, माळशिरस तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री.गोरख वाघमोडे, शाळेचे उपमुख्य प्राध्यापक श्री.शेख सर, शाळेचे रेक्टर वाघमोडे सर, युवा नेते संजय अण्णा वाघमोडे,राजेंद्र वाघमोडे, अहिल्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन वाघमोडे,प्रदीप नलवडे,अक्षय नलवडे,सुजित वाघमोडे,समीर वाघमोडे यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *