Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

इंदापुर तहशिल कार्यालयत पोलीस पाटील दिन उत्साहात साजरा!

इंदापुर तहशिल कार्यालयत पोलीस पाटील दिन उत्साहात साजरा!nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nn१७ डिसेंबर १९६७ यादिवशी महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी पोलीस पाटील कायद्यास मंजुरी दिली. तो दिवस महाराष्ट्र राज्यात पोलीस पाटील दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय राज्य घटनेतील तरतुदी मुळे समाजातील सर्व घटकांना पोलीस पाटील होण्याची संधी मिळाली ही संधी केवळ १९६७ च्या कायद्यामुळे मिळाली या दिवसाचे औचित्य साधून इंदापूर तालुक्यातील पोलीस पाटील यांच्या वतीने तहसिल कार्यालय सभागृह येथे तहसिलदार साहेब इंदापूर यांच्या उपस्थितीत पोलीस पाटील दिन  उत्साहात संपन्न संपन्न झाला. या कार्यक्रमास तालुका कार्यकारी दंडाधिकारी श्रीकांत पाटील साहेब, राज्य गुप्तवार्ता विभागाचे पोलीस निरीक्षक मा, तुकाराम सातव साहेब, इंदापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. धनवे साहेब यांनी मार्गदर्शन केले . पोलीस पाटलांना मार्गदर्शन करताना पाटील साहेब यांनी पोलीस पाटील हे व्यापक समाजहित साधनारे पद असून त्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करणार असल्याचे सांगितले. गौण खनिज उत्खनन प्रतिबंधक कारवाई, कोरोना covid-19 काळातील पोलीस पाटलांचे काम, ई -पीक पाहणी योजनेत पोलीस पाटलांनी केलेले काम याबाबत पाटील साहेब यांनी तालुक्यातील पोलीस पाटलांचे कौतुक केले. इंदापूर तालुक्यातील पोलीस पाटील हे महाराष्ट्रातील आदर्श पोलीस पाटील आहेत अशा शब्दात पोलीस पाटलांचा गौरव केला. राज्य गुप्तवार्ता विभागाचे पोलीस निरीक्षक सातव साहेब यांनी पोलीस पाटलांनी निर्भीडपणे प्रशासनास माहिती द्या, त्यावर योग्य कार्यवाही केली जाईल कायदा व सुव्यवस्था राखणे कामी पोलीस पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे आश्वासित केले. इंदापूर पोलिस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक दुवे सो यांनी पोलीस पाटलांनी तयार केलेल्या ग्रामसुरक्षा दलाच्या कामाचे कौतुक केले गुन्हे अन्वेषण यासाठी व गुन्हे प्रकटीकरणासाठी पोलीस पाटलांचे सहकार्य असते अशा शब्दात पोलिस पाटलाच्या कार्याचा गौरव केला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रदीप पोळ पोलीस पाटील गोखळी यांनी केले. कार्यक्रमात पोलीस पाटलांनी आपापले मनोगत व्यक्त केली त्यामध्ये संतोष शिंगाडे, बाळासाहेब कडाळे यांनी अत्यंत तळमळीने पोलीस पाटलांच्या जीवनाबाबत भूमिका मांडली. वर्धमान बोडके यांनी अध्यात्माच्या माध्यमातून गावामध्ये जनजागृती करण्याबाबत विचार व्यक्त केले . रेश्मा भिसे, तनुजा कुताळ, स्मिता शिंदे, कल्पना फुले यांनी महिला पोलीस पाटील म्हणून काम करत असताना जबाबदारीने कसे काम केले याचे अनुभव कथन केले.  अनिल भांगे, सुनील राऊत, अरुण कांबळे यांनी सर्वांनी जबाबदारी घेऊन काम करायला शिकले पाहिजे, पोलीस पाटील हा जबाबदार घटक आहे. त्यामध्ये कोणतेही मतभेद नसले पाहिजेत, शंकांचे निरसन चर्चा करून केले पाहिजे असे सांगितले. तुषार झेंडे यांनी पोलीस पाटलांचे अधिकार व जबाबदाऱ्या राबविणेबाबत कसे काम करावे तंटामुक्त गाव अभियानात कशा पद्धतीने काम केले याची माहिती देऊन पोलीस पाटलांनी जबाबदारी घेतल्यास अतिशय यशस्वीपणे काम करणे शक्य आहे याबाबत मार्गदर्शन केले मा. तहसिलदार साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस पाटलांच्या  क्रीडा पोशाखाचे वितरण करण्यात आले. त्यानंतर कोरोना covid-19 काळात पोलीस पाटलांनी उल्लेखनीय कामगिरी केली त्याबद्दल प्रशस्तीपत्रक देण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रेश्मा भिसे, ज्योती भोसले, तनुजा कुताळ, अतुल धनवडे,  अरुण कांबळे , सुनील राऊत , बाळासाहेब कडाळे , मोहन चव्हाण, विलास कणसे , अवधूत जगताप , अमर धुमाळ , किरण खंडागळे , महेंद्र पडळकर,  सागर खरात परमेश्वर ढोले यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले ,तसेच सोमनाथ सोनवणे यांनी आभार मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *