Uncategorized

तेरा मोटारसायकल हस्तगत ! इंदापूर पोलिसांची दमदार कामगिरी

तेरा मोटारसायकल हस्तगत ! इंदापूर पोलिसांची दमदार कामगिरीnnnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnइंदापूर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने चोरीस गेलेल्या 13 मोटारसायकल हस्तगत केल्या असून 2 आरोपीना अटक केली असल्याची माहिती इंदापूर पोलीस स्टेशनं चे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दिली.nn5 फेब्रुवारी 2024 रोजी इंदापूर बस स्टॅन्ड येथून 1युनिकॉर्न मोटारसायकल चोरीस गेलेबाबत इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली.घटनेचे गांभीर्य लक्षात घेताच पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या सूचनेवरून तात्काळ गुन्हा नोंदविण्यात आला.गुन्हा रजि नं.136/2024 असा असून भा. द. वि. कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.nnसदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शोध पथकाचे पोसइ राळेभात,सहा फौजदार प्रकाश माने,पो ना खान,पो शि चौधर,पो ना रासकर,यांना गुन्हा तात्काळ उघड आणण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दिल्या.nnगुन्ह्याचा तांत्रिक तपास करून फिर्यादीच्या मदतीने संशयित आरोपी नामे बाबासाहेब नारायण राऊ (वय 27 वर्षे )शेजबाभाळगाव ता मोहोळ जि सोलापूर यास ताब्यात घेतले.गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल जप्त केला.nअधिकचा कसून तपास केला असता त्याचा साथीदार मित्र गणेश भारत हेळकर (वय वर्षे 27)अंकुली ता मोहोळ जि सोलापूर याचा शोध घेऊन त्यास अटक केली.या दोघांची कसून चौकशी केली असता त्यांचेकडून इतर 12 मोटारसायकल जप्त केल्या.सदर इसम फायनान्स कंपनीचे लोक आहेत अशी लोकांना बतावणी करून चोरून आणलेल्या गाड्या ग्राहकांना देत असत.व मिळेल तेवढे पैसे घेऊन काही काळाने कागदपत्रे येताच गाडी नावावर करून देतो असे सांगत होते.अधिक तपास केला असता 13मोटारसायकल पैकी 8गुन्हे उघडकीस आले आहेत.त्यामध्ये टेम्भूर्णी, मोहोळ, अकलूज,सलगर वस्ती, दौंड,कुर्डुवाडी येथील गुन्ह्यातील गाड्यांचा समावेश आहे.nnसदर ची कारवाई पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,बारामती चे अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव,बारामती चे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड,यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.nnसदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांचे मार्गदर्शनाखाली पो स ई राळेभात, सहा फौजदार प्रकाश माने इत्यादी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *