इंदापुर तालुकास्तरीय CSR अंतर्गत मोजमाप शिबिर संपन्नnn
n( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnपुणे जिल्हा परिषद पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे आयोजित, *पंचायत समिती इंदापूर शिक्षण विभाग समावेशित शिक्षण इंदापूरचे गटशिक्षणाधिकारी आदरणीय अजिंक्य खरात व पुणे जिल्हा परिषद पुणे चे जिल्हा समन्वयक आदरणीय ज्ञानदेव देवकाते यांच्या मार्गदर्शनाखाली-फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स कंपनी शिरूर व CSR अंतर्गत इंदापूर तालुकास्तरीय दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य देण्याकरिता मोजमाप शिबिर आयोजन दिनांक:-25/12/2023 रोजी नारायणदास रामदास हायस्कूल इंदापूर येथे करण्यात आले.nnकार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. गटशिक्षणाधिकारी आदरणीय अजिंक्य खरात व पुणे जिल्हा परिषद पुणे चे जिल्हा समन्वयक श्री ज्ञानदेव देवकाते व नारायणदास रामदास हायस्कूल इंदापूर शाळेचे मुख्याध्यापक श्री सोरटे सरव CSR मॅनेजर श्री.अमोलजी फटाले सर या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पालकांना अनमोल मार्गदर्शन केले.व शुभेच्छा दिल्या.nnसदर शिबिरात दिव्यांग विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार एकूण 70 विद्यार्थ्यांना श्रवण यंत्र कॅपो व्हीलचेअर ट्रायसिकल साहित साधने संदर्भित करण्यात आले. आलेल्या विद्यार्थ्यांना बिस्किट पुडे व खाऊ वाटप करण्यात आला.nnसदर तपासणी शिबिरास CSR मॅनेजर श्री.अमोलजी फटाले सर, सुदर्शन गोरे अनिल जोगदंड,गौरिश सर,लव कुमार सर,निरज कुमार सर,रिषभ सर, व समावेशित शिक्षण विभाग माधुरी सावंत ज्ञानेश्वर साळुंखे सर बशीर सय्यद सर सुधाकर पाटील सर शंकर सावंत सर किशोर कानगुडे सर मनिषा गडदे व पालक विद्यार्थी शिक्षक वृंद ग्रामस्थ तालुकास्तरीय दिव्यांग मोजमाप शिबिरास उपस्थित होते.