Uncategorized

विश्वासराव रणसिंग महाविद्यालयास यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या बी ए( कला शाखा) अभ्यासकेंद्रास मान्यता

विश्वासराव रणसिंग महाविद्यालयास यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या बी ए( कला शाखा) अभ्यासकेंद्रास मान्यताnnnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnइंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब ता. इंदापूर येथील महाविद्यालयास यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या बीए ( कला शाखा ) च्या अभ्यास केंद्रास मान्यता मिळाली असून चालू शैक्षणिक वर्ष २०२३ -२४ करिता प्रथम वर्ष बीए साठी विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. याबाबत केंद्र संचालक प्राचार्य डॉक्टर अंकुशराव आहेर यांनी सांगितले, महाविद्यालयास यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या प्रवेश प्रक्रियेला मान्यता मिळाली असून विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश घेता येईल.nnnnमुक्त विद्यापीठातर्फे विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया राज्यभर सुरू असताना विश्वासराव रणसिंग महाविद्यालयास यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अधिकार मंडळाने मान्यता दिल्याने चालू शैक्षणिक वर्षापासून बीए ( कला शाखा) प्रथम वर्ष २००० पॅटर्न मान्यता मिळाली असून विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार असल्याचे संस्था सचिव विरसिंह रणसिंग यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *