Uncategorized

मराठा आंदोलकांवरील लाठीमार दुर्दैवी – हर्षवर्धन पाटील

मराठा आंदोलकांवरील लाठीमार दुर्दैवी – हर्षवर्धन पाटीलnnnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnमराठा समाजातील युवकांना शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण मिळणे गरजेचे आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (ता. अंबड ) येथे शांततेच्या मार्गाने आमरण उपोषणास बसलेल्या मराठा आंदोलकावरील पोलिसांच्या लाठीमाराची घटना दुःखद व दुर्दैवी आहे.nnया दुर्दैवी घटनेस दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. ते पुढे म्हणाले, मराठा समाज बांधवांना आरक्षण मागणे हा हक्क आहे. मराठा आरक्षण मागणीसाठी आम्ही सर्वजण मराठा आंदोलनकर्त्यां सोबत आहोत. आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे दिनांक 29 ऑगस्ट पासून मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणास बसलेले आहेत. येथील लाठीमाराची घटना चुकीची असून, शासनाने याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *