Uncategorized

कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध जाहीर

कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लागणार की बिनविरोध होणार याची उत्सुकता होती. मंगळवार दि.12 आक्टोबर रोजी अखेर हे चित्र स्पष्ट झाले असून नेहमीप्रमाणे या ही निवडणुकीत कारखाना बिनविरोध करण्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना यश आले आहे.nnया निवडणुकीत दाखल असणारे अर्ज माघारी घेण्यासाठी मंगळवार दि.१२ आक्टोबर हा शेवटचा दिवस होता. या दिवशी २१ जागांसाठी २१ अर्ज राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली असून केवळ अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी आहे.nnमाजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कार्यक्षेत्रातील सभासदांना केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ही निवडणूक बिनविरोध पार पडत असुन पुन्हा एकदा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली युवक सहकाऱ्यांना सोबत घेऊन कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याची वाटचाल सुरू राहणार आहे.nnइंदापूर गटातून भरत शहा शांतीलाल शिंदे रवींद्र सरडेnnकालठण गटातून हर्षवर्धन पाटील हनुमंत जाधव छगन भोंगळेnnभिगवण गटातून पराग जाधव विश्वास देवकाते गायकवाड निवृत्ती भिकूnnपळसदेव गटातून भूषण प्रकाश काळे प्रवीण देवकर रतन हरिश्चंद्र देवकरnnमहिला राखीव शारदा कुबेर पवार कांचन अशोक कदमnnअनुसूचित जाती जमाती दुर्गे केशव विनायक इतर मागास प्रवर्ग सतीश उद्धव व्यवहारेnnभटक्या विमुक्त जाती प्रवर्ग पारेकर हिरा शंकरnn“ब” वर्ग प्रतिनिधी वसंत मोहोळकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *