Uncategorized

वालचंदनगरच्या माजी सरपंच छाया मोरे यांना टाॅप १०० २०२२ इन्फ्लुइंटल इंडियन्स अवॉर्ड पुरस्कार

वालचंदनगरच्या माजी सरपंच छाया मोरे यांना टाॅप १०० २०२२ इन्फ्लुइंटल इंडियन्स अवॉर्ड पुरस्कारnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnवालचंदनगर (ता.इंदापूर) : ज्या भारतीय लोकांनी सामाजिक प्रेरणादायी काम केले आहे त्यांना है पेजे मिडिया इंडिया यांनी टाॅप १०० २०२२ इन्फ्लुइंटल इंडियन्स अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित केले आहे.nयामध्ये टाॅप १०० २०२२ इन्फ्लुइंटल इंडियन्स अवॉर्ड पुरस्काराने वालचंदनगरच्या माजी सरपंच छाया मोरे यांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये विज्ञान, शिक्षण, सामाजिक, सोशल बिझनेसचे प्रेरणादायी व जनतेच्या हितासाठी कायम काम केले आहे. अशा व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.nnवालचंदनगरच्या माजी सरपंच छाया दादासाहेब मोरे यांनी केलेली सामाजिक कामे व कोरोना काळातील केलेली लोकांची मदत व समाज उपयोगी कामे, यासांठी त्यांना सन्मानित करण्यात आले. महिला सशक्तीकरण, बालविवाह, आरोग्य अशा विविध प्रश्नांवरती त्यांनी काम केले.nnमला मिळालेला पुरस्कार हा माझा वैयक्तिक नसून, समस्त वालचंदनगर वासियांचा असल्याचे छाया मोरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *