Uncategorized

इंदापूर तालुक्यातील कडबनवाडीत विमान कोसळले, महिला पायलट सुरक्षित

इंदापूर तालुक्यातील कडबनवाडीत विमान कोसळले, महिला पायलट सुरक्षितnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnआज दिनांक 25.07.2022 रोजी 11:20 ते 11:25 वाजेदरम्यान कारवार एव्हिएशन बारामती यांचे शिकाऊ विमान कडबनवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे गावचे हद्दीत कोसळले असून यामध्ये एक शिकाऊ महिला उमेदवार भाविका राठोड वय २२ वर्ष रा. पुणे किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.nnकारवार एव्हिएशन बारामती यांचे शिकाऊ विमान हे इंधन संपल्यामुळे कडबनवाडी गावचे हद्दीत कोसळले. कु. भविका राठोड या किरकोळ जखमी झाले असून त्यांना औषधउपचारासाठी नवजीवन हॉस्पिटल, शेळगाव या ठिकाणी पाठविण्यात आले आहे. इतर कोणत्याही प्रकारची हानी नाही, घटना ठिकाणी कारवार एव्हिएशन बारामती यांचे स्टाफ हजर असून योग्य बंदोबस्त घटनास्थळी ठेवला असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनातर्फे प्राप्त झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *